Tuesday, 7 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 07.03.2017 1.00pm

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कामकाज सुरु होण्याआधी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधानभवनाबाहेर आंदोलन केलं. तूरडाळ आणि कांद्याला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी, हे आंदोलन करण्यात आलं. यात खासदार राजु शेट्टींसह, अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

****

विधानसभेत आज सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस विधानसभा अध्यक्षांना देत, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, या आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली. 

विधानपरीषदेत आज पुन्हा विधानपरीषद सदस्य प्रशांत परिचारक, यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली. परिचारक यांचं सदस्यत्व रद्द होईपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा, मुंडे यांनी दिला.  

****

राष्ट्रीय एकात्मतेसाठी देशभरात एका राष्ट्रभाषेची गरज असून, स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षानंतर आपल्या देशात एक राष्ट्रभाषा नसल्याची खंत, प्रसिद्ध तत्त्ववेत्ते डॉ. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केली. पुणे इथं टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित, दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते आज बोलत होते. स्वराज्य, स्वदेशी, स्वभाषा यांचं महत्व त्यांनी यावेळी विशद केलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच, या लोकमान्य टिळकांच्या प्रसिद्ध विधानाला शंभर वर्ष पुर्ण झाल्या निमित्त, या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या चर्चासत्राचा समारोप होत आहे.

****

बाटलीबंद पाण्याचे दर विविध ठिकाणी वेगवेगळे आकारण्याबद्दल, केंद्र सरकारनं संबंधित कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. विमानतळ, हॉटेल्स आणि मॉलमध्ये एकाच दरानं पाणी मिळायला हवं, असे निर्देशही, अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिले आहेत. यासंदर्भात ग्राहकांकडून मिळालेल्या तक्रारींची दखल घेत, मंत्रालयानं हे पाऊल उचललं आहे.

****

महिलांचं सशक्तीकरण, मुक्ती आणि समानता या तीन गोष्टी राष्ट्रीय विकासात, त्यांची भूमिका स्पष्ट करतात, असं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात ते बोलत होते. महिलांना समान अधिकार आणि संधी देण्यास सरकार कटीबद्ध असल्याचं ते म्हणाले. सरकार महिलांच्या सबलीकरणासाठी सतत प्रयत्न करत असल्याचं, केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी यावेळी सांगितलं. 

****

अमेरिकेत सहा मुस्लिम बहुल देशांच्या नागरिकांना, तीन महिन्यांसाठी, आणि सर्व देशांच्या शरणार्थींना, चार महिन्यांसाठी प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली. यात इराण, लिबिया, सीरिया, सोमालिया, सुदान आणि यमन या सहा देशांचा समावेश आहे. १६ मार्चपासून हा आदेश लागू होणार आहे.

दरम्यान, अमेरिकेनं त्यांच्या नागरिकांना, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशची यात्रा न करण्यास सांगितलं आहे. दक्षिण आशियात कार्यरत असणारे दहशतवादी गट अमेरिकी नागरिकांसाठी धोका असल्याचं, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. भारतातही दहशतवादी गट सक्रीय असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.

****

यावर्षी योग्य

यावर्षी योग्य प्रमाणात पाऊस झाल्यानं, २०१६-१७ या वर्षात कांदा निर्यातीनं उच्चांक गाठला आहे. गेल्या नोव्हेंबर पर्यंत २० लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली असून, ती मार्च ते एप्रिलपर्यंत २५ ते ३० लाख मेट्रिक टन इतकी होण्याची शक्यता, व्यापारी वर्गानं व्यक्त केली आहे. या पूर्वी २००९-१० मध्ये १८ लाख मेट्रिक टन इतकी उच्चांकी निर्यात झाली होती. हा उच्चांक यंदा मोडीत निघण्याची शक्यता आहे.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कोणताही फेरफार करणं शक्य नसल्याचं सांगत, राज्य निवडणूक आयोगानं यासंदर्भातला विरोधकांचा आरोप फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयानंही इव्हीएम यंत्रं सुरक्षित असल्याचा निर्वाळा २०१४ मध्ये दिला होता, असं राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला होता.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरु इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा आजचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होताच भारताचा दुसरा डाव २७४ धावात संपुष्टात आला. चेतेश्वर पुजारानं ९२, अजिंक्य रहाणेनं ५२ तर लोकेश राहुलनं ५१ धावा केल्या.
//*******//
प्रमाणात पाऊस झाल्यानं
, २०१६-१७ या वर्षात कांदा निर्यातीनं उच्चांक गाठला आहे. गेल्या नोव्हेंबर पर्यंत २० लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली असून, ती मार्च ते एप्रिलपर्यंत २५ ते ३० लाख मेट्रिक टन इतकी होण्याची शक्यता, व्यापारी वर्गानं व्यक्त केली आहे. या पूर्वी २००९-१० मध्ये १८ लाख मेट्रिक टन इतकी उच्चांकी निर्यात झाली होती. हा उच्चांक यंदा मोडीत निघण्याची शक्यता आहे.

****

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कोणताही फेरफार करणं शक्य नसल्याचं सांगत, राज्य निवडणूक आयोगानं यासंदर्भातला विरोधकांचा आरोप फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयानंही इव्हीएम यंत्रं सुरक्षित असल्याचा निर्वाळा २०१४ मध्ये दिला होता, असं राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला होता.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरु इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा आजचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होताच भारताचा दुसरा डाव २७४ धावात संपुष्टात आला. चेतेश्वर पुजारानं ९२, अजिंक्य रहाणेनं ५२ तर लोकेश राहुलनं ५१ धावा केल्या.

//*******//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...