आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१४ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
राज्यात
आज अनेक जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या सभापती- उपसभापती पदाच्या निवडणुका होत आहेत.
यासाठी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज एक दिवस सुटी देण्यात आली आहे. विधी
मंडळाच्या काही सदस्यांनी केलेल्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचं, पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांच्या सभापतीपदांसाठीही आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत
सहाय्यक निवडणूक अधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची
निवडणूक पुढच्या मंगळवारी, २१ मार्च रोजी होईल.
****
नाशिकच्या
महापौर आणि उपमहापौर पदासाठीही आज निवडणूक होत आहे. महापालिकेत १२२ जागांपैकी ६६ जागा
मिळवणाऱ्या भाजपला स्पष्ट बहुमत आहे. नाशिकचं महापौरपद यंदा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी
राखीव असून भाजपनं नगरसेविका रंजना भानसी यांना उमेदवारी दिली आहे. तर उपमहापौरपदासाठी
प्रथमच निवडून आलेले प्रथमेश गीते यांना संधी देण्यात आली आहे. ३५ नगरसेवक असलेल्या
शिवसेनेनं या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.
****
मणिपूरमध्ये
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस
आणि भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसनं आपल्या २८ सदस्यांसोबत
नॅशनल पिपल्स पक्षाच्या आणखी चार सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे, तर भारतीय
जनता पक्षानं, तृणमुल काँग्रेस आणि लोक जनशक्ती पक्षाच्या प्रत्येकी एका सदस्यासह ३२
आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.
****
राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी सदस्य, भारतीय
काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी.एम. भालेराव
यांचं काल अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा इथं, ह्रदयविकाराच्या
धक्क्यानं निधन झालं. ते ७७ वर्षाचे होते. भालेराव
यांनी अल्पसंख्याक आयोगासाठी भरीव कामगिरी केली आहे.
//******//
No comments:
Post a Comment