Thursday, 21 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 21.09.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 SEP. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या निमित्तानं देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भक्तीभावानं मातेच्या शैलपुत्रीच्या रुपाची पूजा केली जाते असं मोदींनी आपल्या ट्वीट मधे म्हटलं आहे.

****

वस्तु आणि सेवा कराच्या कमी दराचा लाभ घेण्याच्या हेतुनं आपल्या उत्पादनाची नोंदणी रद्द करु इच्छिणाऱ्या व्यापाऱ्यांना कर आयुक्तांच्या समक्ष आपल्या अधिकारांचा त्याग करत असल्याबाबतचं पत्र सदर करावं लागेल असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. व्यावसायिकांना अन्नधान्य , दाळी तसंच पीठासारख्या उत्पादनांवर आपण स्वेच्छेनं आपल्या अधिकारांचा त्याग केला असल्याचं छापावं लागेल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. अन्नधान्य, दाळी तयार पीठं यावर ५ टक्के कर लागतो, मात्र जी एस टी लागू झाल्यानंतरही या उत्पादनांना आतापर्यंत करमुक्त ठेवण्यात आलं होतं. जीएस टी लागू झाल्यानंतर कर चुकवण्यासाठी अनेक व्यापारी आपली नोंदणी रद्द करत असल्याची बाब लक्षात आल्यानं या महिन्यात झालेल्या बैठकीत १५ मे २०१७ पर्यंत नोंदणी असलेल्या उत्पादनांना कायम नोंदणीकृत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंत्रालयाच्या सूत्राकडून सांगण्यात आलं.

****

देशातल्या ४२ सरकारी आणि खासगी बँकांनी आधार कार्ड बनवण्यासाठी आणि त्यातल्या त्रुटींमध्ये सुधारणा करण्यासाठी बँकेच्या परिसरात एक हजार पेक्षा जास्त आधार केंद्र उघडले आहेत.  तसच बँकांच्या १५ हजार शाखांनी आधार केंद्र उघडण्याच आश्वासन दिल असल्याच आधार प्रधिकरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूष पांडे यांनी सांगितलं.

****

पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय देशभरात, पर्यावरणावर आधारित प्रकृति खोज या प्रश्न मंजुषेचं आयोजन करणार आहे. ही प्रश्न मंजुषा ५ टप्प्यांमध्ये होणार आहे. येत्या २५ तारखेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रश्नमंजुषेच्या पात्रता फेरीला सुरुवात होणार आहे. ही प्रश्नमंजुषा ऑनलाईन असेल. दुसरा टप्प ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर, तिसरा २० ते २४ नोव्हेंबर, चौथा ४ ते ६ डिसेंबर तर शेवटचा पाचवा टप्पा १८ ते २० डिसेंबर दरम्यान आयोजित केला जाईल.

****

ारत दहशतदाचा तीव्र निषेध करत असून दहशतवादाच्या कोणत्याही कृत्याला भारताच समर्थन नसल्‍याच न्युयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या सत्रातल्या शांघाई सहकार्य बैठकीत बोलतांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्‍हटल आहे. स्वराज यांनी यावेळी दहशतादावर भारताची भूमिका स्पष्ट केली.

शांघाई संघटनेतील सहभागी देशांसोबत ंपर्क वाढवणं ही भारताची प्रामिकता असल्याच स्वराज म्हणाल्या.

****

सरकारकडे असलेल्या १८ लाख टन दाळीचा साठी संपवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं केंद्रीय अन्नधान्य मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. याकरिता राष्ट्रीय सहकार ग्राहद्झ्धितस्बंधित संघटनांना आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यास सांगण्यात आलं असल्याचं पासवान यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात ते वार्ताहरांशी बोलत होते. या वर्षी रास्त हमीभावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळत असेल तर सरकार तूर, उडीद, मूग, या दाळींची खरेदी सरकार करेल, असं ते म्हणाले. देशात साखरेचा २७० लाख ७० हजार टन इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा असून, सण उत्सवांच्या काळात साखरेच्या किमती वाढणार नाहीत यावर सरकार नियंत्रण ठेवेल असं पासवान यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

जम्‍मू-कश्‍मीरमध्ये पाकिस्‍तानच्या लष्करानं जम्‍मू आणि सांबा जिल्‍ह्‍यातल्या आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या अर्निया आणि रामगड भागात पुन्हा गोळीबारी करत संघर्ष विरामाचं उल्‍लंघन केलं आहे. यात दोन जण जखमी झाले आहे. काल मध्यरात्री पाकिस्तानी सैनिकांनी अरनिया सेक्टर क्षेत्रातल्या भारतीय चौक्या आणि निवासी वसाहतींवर लक्ष करत गोळीबार केल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या सूत्रानं आकाशवाणीच्या वार्ताहराला सांगितलं. त्यानंतर सांबा जिल्ह्यातल्या रामगड भागातही पाकिस्तानच्या सैनिकांनी उखळी तोफांचा मारा केला. सकाळी अकरा वाजेपर्यंत काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर रामगडमधल्‍या शाळां पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. अरनियातल्या शाळा गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत.

****

उत्तर महाराष्ट्राचं आराध्यदैवत आणि साडेतीन शकतीपीठापैकी अर्धे पीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणी इथल्या सप्तश्रृंगी देवीच्या शारदीय नवरात्रास प्रारंभ झाला आहे. यानिमित्त आज वैदिक मंत्रोच्चारात देवीच्या अलंकारांची महापुजा करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली सकाळपासूनच भाविकांनी गडावर देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. नवरात्राच्या निमित्तानं देवीचं मंदिर २४ तास खुलं राहणार असून या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णय देवस्थानच्या वतीनं घेण्यात आला आहे. यावर्षीपासून प्रथमच बोकड बळी प्रथेवर बंदी घालण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड मधील रेणुका देवी, येवला तालुक्यातील कोटमगाव येथील देवी तसेच नाशिक शहरातील कालिका देवीच्या यात्रेला देखील आज पासून सुरुवात झाली नाशिकच्या कालीका माता देवीची घटस्थापना माधवगिरी महाराज तर महापूजा नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आली.

****

No comments: