आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२३ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौर्यावर असून, त्यांनी आज शहनशाहपुर इथं पंतप्रधान
आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप केलं. तत्पूर्वी पशुधन आरोग्य मेळाव्याचं
उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं. काल पंतप्रधानांनी वाराणसी - सुरत महामना एक्सप्रेस
रेल्वे गाडीचा शुभारंभ केला, तसंच गंगा नदीवरच्या दोन पुलांसह २५ प्रकल्पांचं उद्घाटनही
केलं.
****
विशेष पोलीस अधिकार्यांचं वेतन आधार संलग्न बँक खात्यांतून
करा आणि त्यांच्या नेमणुकीची प्रक्रीया पारदर्शक ठेवा असं केंद्र सरकारनं जम्मू आणि
काश्मीर सरकारला सांगितलं आहे. कोणालाही बोगस नावानं नोंदणी करून पदाचं मानधन उकळता
येऊ नये यासाठी ही काळजी घेणं आवश्यक असल्याचं गृह मंत्रालयानं काल जम्मू काश्मीर सरकारला
पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरुन प्रसारित होणार्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३६वा भाग
असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे,
महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अंगणवाडी सेविकांचे मानधन पाच हजार रुपयांवरून साडे
सहा हजार रुपये,मदतनीसांचे मानधन अडीच हजार रूपयांवरून साडे तीन हजार रूपये, तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन तीन हजार दोनशे
पन्नास रूपयांवरून साडे चार हजार रूपये करण्यात आलं आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली असून, धरणाची
पाणी पातळी ९८ टक्क्यांवर पोहोचली आहे. यामुळे धरणातून होणारा विसर्गही वाढवण्यात आला
आहे. सध्या धरणाच्या अठरा दरवाजातून साडे तेरा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा
विसर्ग सुरू आहे.
****
No comments:
Post a Comment