Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 29 SEP. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९सप्टेंबर २०१७ सकाळी
६.५० मि.
****
** देशभरात येत्या १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान ग्रामीण समृद्धी आणि स्वच्छता पंधरवडा
साजरा करणार
** राज्यातल्या रस्त्यांवरचे खड्डे न बुजवण्यासंदर्भात दोन आठवड्यात आपलं म्हणणं
न्यायालयात सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश
** शेतकऱ्यांना
सिंचनासाठी बंद पाईप लाईन द्वारे पाणी देणार - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
** नवबौद्धांना अल्पसंख्याक दर्जा तसंच सुविधा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
आणि
** चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून २१ धावांनी पराभव
****
देशभरात येत्या १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान ग्रामीण समृद्धी आणि स्वच्छता पंधरवडा
साजरा करण्यात येणार असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी
काल नवी दिल्ली इथं सांगितलं. देशभरातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये पंधरवडा केला जाईल.
या काळात प्रत्येक गावांमध्ये आमसभा घेऊन विकासाच्या मुद्यावर चर्चा करण्यात येईल.
गावात स्वच्छता, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, तसंच पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी देशव्यापी
सर्वेक्षण करणं, हा या पंधरवड्याचा उद्देश असल्याचं तोमर यांनी सांगितलं.
****
दक्षिण कोरियाचा चार दिवसांचा दौरा करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सिंगापूर इथं पोहोचले. सिंगापूर इथं काल त्यांनी विविध कंपन्यांच्या
प्रतिनिधींसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी सिंगापूरमधल्या आघाडीच्या कंपन्या, विशेषत:
महाराष्ट्रात विस्तार असलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत विविध विषयांवर संवाद साधला.
सिंगापूर इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया स्टडिज- आयएसएएस, नॅशनल युनिव्हर्सिटी
ऑफ सिंगापूर -एनयुएस आणि सीआयआय यांच्या वतीनं आयोजित व्याख्यानातही काल त्यांनी मार्गदर्शन
केलं.
****
राज्यातल्या
रस्त्यांवरचे खड्डे न बुजवण्यासंदर्भात आपलं म्हणणं दोन आठवड्यात न्यायालयात सादर करण्याचे
आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाला दिले आहेत. हे खड्डे बुजवायला सरकारकडे
पैसे नाहीत काय असा सवाल ही न्यायालयानं शासनाला केला आहे. राज्यातल्या रस्त्यांची
अवस्था पाहून न्यायालयानं स्वत: होऊन याचिका दाखल करुन घेतली आहे. येत्या ८ नोव्हेंबर
रोजी या याचिकेची सुनावणी होणार असून, तत्पूर्वी राज्यातले सर्व महापालिका आयुक्त,
नगरविकास विभाग, ग्रामीण विभाग तसंच पंचायतराज आदी स्थानिक स्वराज्य संस्थांनी खड्डे
न बुजवण्याबाबत आपलं म्हणणं सादर करण्याचं या आदेशात म्हटलं आहे.
****
राज्यात धरणं झाली, मात्र सिंचन व्यवस्था परीणामकारक तयार
झाली नसल्याचं जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी म्हटलं. औरंगाबाद इथं वार्ताहरांशी
ते बोलत होते. धरणांमधून कालव्याद्वारे शेती सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या पाण्याची
मोठी गळती होते, त्याचबरोबर या व्यवस्थेच्या देखभालीचा खर्चही मोठा आहे, त्यामुळे आता
शेतकऱ्यांना बंद पाईप लाईन द्वारे पाणी देण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारनं घेतला असल्याचं
त्यांनी सांगितलं, ते म्हणाले…
कॅनॉलची दुरुस्ती मेंटनस हा प्रश्न एवढा गंभीर आहे. की त्यामुळे धोरणात्मक निर्णय केला पहिजे सरकारने की पुढच्या
काळात आपण जे पाणी देणार आहोत ते ओपन कॅनोलने देणार नाही ते बंद पाईपलाईनमधून देवू.
आता अनेक वेळेला असे प्रश्न आहेत. की शंभर-शंभर दोन-दोनशे .किलोमीटरचे आपले कॅनॉल आहेत
त्या ठिकाणी पन्नास किलोमीटर जे आहेत पण इथून आम्ही हजार क्यूसेक्सने पाणी सोडल तर
टेला फक्त हजार क्यूसेक्सने पाणी जात आहे. मंडळी इतक ऐणशी नव्वद टक्के पाणी शेवटपर्यंत
पोहचतच नाही टेलच्या लोकांना आपन लाख शेतात आसतांना पण त्यांना कधी पाणी मिळतच नाही
इतक्या वर्षामध्ये अशी परिस्तीती आहे.आणि म्हणून ते जर पाणी शंभर टक्के कॅनॉनने जर
जायच असेल तर तिथ त्याला पाईपलाईन शिवाय पर्याय नाही.
दरम्यान, यावर्षी काठोकाठ भरलेल्या पैठणच्या जायकवाडी जलाशयाचं पूजन जलसंपदा
मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते काल करण्यात आलं. यावेळी, पैठणचे नगराध्यक्ष सुरज
लोळगे, कार्यकारी अभियंता चारुदत्त बन्सोड, सहाय्यक अभियंता अशोक चव्हाण आदींसह पाटबंधारे
विकास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
****
राज्यातल्या नवबौद्धांना अल्पसंख्याक दर्जा तसंच सुविधा देण्याचा निर्णय अल्पसंख्याक
विभागानं काल जारी केला आहे. नवबौद्ध कायदेशीर रित्या बौद्ध असल्यानं अल्पसंख्याक समुदायासाठी
राबवण्यात येत असलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यास ते पात्र असल्याचं या निर्णययात
म्हटलं आहे. बौद्ध धर्म स्वीकारलेल्या अनुयायांना अनुसूचित जातींसाठीचे कायदेशीर लाभ
राज्य सरकारनं या निर्णयाद्वारे दिले आहेत.
****
राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका पुष्पा
पागधरे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत
ही घोषणा केली. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप
आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
धरणातून शेतकऱ्यांना
पाणी देण्यासाठी वितरीकांची कामं
ही खाजगी कंपन्याच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या
माध्यमातून करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे
यांनी सांगितलं. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्याच्या
पैठण तालुक्यातला ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद आणि
नियोजन करणार असल्याचं सांगतांना ते म्हणाले,
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन
योजना टप्पा क्रमांक एक पूर्ण झालेला आहे. परंतु टप्पा क्रमांक दोन हा बावन्न-त्रेपन्न
गांवाना पाणी देणारा खूप महत्वाचा आहे. पस्तीस कोटी रूपये शासनाने आम्ही त्याला नियोजीत
केलेले आहेत. तरी परंतु यासंदर्भामध्ये जास्तीत जास्त ईफीसीएन्सीने आणि ईफेक्टीव्ह
काम होण्यासाठी त्याच्यात आणखी काय बदल करता येईल यासंदर्भात देखील एक विशेष बैठक मुंबईतही
लावण्यात आलेली आहे. जेनेकरून पसतीस कोटींच नियोजन आणि आणखी ॲडिशनल काही पैसे या प्रकल्पाला
पूर्ण करण्यासाठी लागतील त्याच नियोजन करण्यासाठी देखील मुंबईत याची बैठक घेण्यात आलेली
आहे.
****
औरंगाबाद नजीक चिकलठाणा इथं रेल्वेच्या साफसफाईसाठी पीट लाईनचं काम येत्या वर्षभरात
पूर्ण होईल, असं दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी सांगितलं.
ते काल या पीट लाईनची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद इथं आले असता वार्ताहरांशी बोलत होते.
परभणी मुखेड या रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल, तसंच दक्षिण
मध्य रेल्वे मार्गावर असणारे सर्व मानव रहित रेल्वे फाटकं बंद करणार असल्याचंही त्यांनी
यावेळी सांगितलं.
औरंगाबाद इथं आयोजित मराठवाड्याच्या विविध प्रश्नांवर आयोजित बैठकीलाही रेल्वेचे
महाव्यवस्थापक काल उपस्थित होते. यावेळी खासदार
चंद्रकांत खैरे यांनी मराठवाड्यातल्या रेल्वेच्या विकास कामांना गती देऊन अनुशेष भरून
काढावा आणि मराठवाड्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी अशी सूचना त्यांना केली. मराठवाड्यातल्या ३७२ ब्रिटिशकालीन
जीर्ण पुलांची दुरुस्ती करण्याची ग्वाही आपल्याला लोकसभेत देण्यात आली असल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं.
****
शिवसेनेच्या वतीनं जालना इथं काल पेट्रोल, डिझेल आणि गॅस दर वाढीविरोधात मोर्चा
काढण्यात आला. शिवसेनेचे पदाधिकारी बैलगाडीसह सायकल चालवत या मोर्चात सहभागी झाले.
मामा चौक, महात्मा फुले मार्केट मार्गे काढण्यात आलेल्या मोर्चाचा महावीर चौकात समारोप
करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात होत असलेल्या ३५१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता ३ हजार १८७
पदांसाठी ६ हजार २६८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप ही करण्यात
आलं आहे. जिल्ह्यातल्या २२ ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे. या निवडणुकीसाठी सात
ऑक्टोबर रोजी मतदान होईल.
बीड जिल्ह्यातल्या ६९० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २२१६ उमेदवार तर सदस्यांसाठी
सहा हजार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर
काल लगेचच निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं.
****
बंगळूर इथं काल झालेल्या चौथ्या
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा २१ धावांनी पराभव
केला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना निर्धारीत ५० षटकात
भारतासमोर विजयासाठी ३३४ धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारत ५० षटकात आठ
गडी बाद ३१३चं धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाच्या डेविड वार्नरने आपल्या शंभराव्या
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शतक ठोकलं. या पराभवाबरोबरचं भारताची
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातल्या पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण
झाली आहे.
****
नांदेड जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीत ३५ पैकी २०
जागा जिंकून काँग्रेस पक्षानं वर्चस्व प्राप्त केलं आहे. १७ जागांसाठी झालेल्या मतदानाची
काल मतमोजणी करण्यात आली. या मंडळावरच्या १८ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या
आहेत.
****
जालना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल
चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या चार संशयितांना
अटक करून, २४ लॅपटाप, तीन एलसीडीसह पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई आणि
जालना इथले रहिवासी असलेल्या या संशयितांनी गेल्या आठवड्यात शहरातल्या एका लॅपटॉप विक्रीच्या
दुकानात चोरी केली होती.
****
No comments:
Post a Comment