आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१५ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
कृषीक्षेत्रात
महिलांच्या असलेल्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टानं आज देशात महिला
शेतकरी दिवस साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्याचा निर्णय कृषी मंत्रालयानं २०१६
मध्ये घेतला. या निमित्त नवी दिल्लीमध्ये एक समारंभ आयोजित करण्यात आला असून, कृषीमंत्री
राधामोहन सिंह यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
माजी राष्ट्रपती भारतरत्न
ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन, वाचन प्रेरणा दिवसही आज साजरा होत आहे.
****
आदिवासींचा
विकास होण्याच्या दृष्टीनं आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी सरकार कर्तव्यबद्ध आहे,
असं केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथे एकलव्य
एकल विद्यालयाच्या डिजिटलायझेशनच्या कार्यक्रमात बोलत होते. सर्वंकष विकासासाठी योग्य
धोरणाची गरज असल्याचं मत गडकरी यांनी व्यक्त केलं.
****
राज्यातली
पाणी टंचाई, भारनियमन आणि इंधनाचे वाढते दर याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या वतीनं आजपासून राज्यात आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात
पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
****
परभणीचे माजी
खासदार गणेश दूधगावकर यांना परभणी पोलिसांनी अटक केली आहे. तत्कालीन तलाठी डी एस कदम
यांच्याशी संगनमत करून, ज्ञानोपासक गृहनिर्माण संस्थेची जागा दूधगावकर यांनी बळकावल्याचा
आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता, यासंदर्भात दाखल तक्रारीनंतर नानलपेठ पोलिसांनी
दूधगावकर यांच्यासह निवृत्त तलाठी डी एस कदम यानाही अटक केली.
****
भारताचा आघाडीचा
टेनिसपटू लिएँडर पेसनं सेंटो डोमिंगो खुला चषक टेनिस स्पर्धेतल्या पुरुष दुहेरीत अजिंक्यपद
मिळवलं आहे. डोमिनिका गणराज्याची राजधानी सेंटो डोमिंगो इथे खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या
अंतिम सामन्यात पेसनं आपला मेक्सिकन जोडीदार मिग्वेल एंजल रेयेस वारेला याच्या साथीनं
हा किताब जिंकला.
*****
***
No comments:
Post a Comment