आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.००
वाजता
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज दोन्ही सभागृहात
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. ऱाष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांनी गेल्या गुरूवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहाला संबोधित
केलं होतं.
दरम्यान, काँग्रेस पक्षानं आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी करुन या आठवड्यात सभागृहात उपस्थित राहण्यास
सांगितलं आहे.
****
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्रालयानं आजपासून रस्ते सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाचं औचित्य साधून नवी दिल्लीत राजघाट इथून दुचाकी
फेरीद्वारे या अभियानाला सुरुवात होईल. ही दुचाकी फेरी, महात्मा गांधींशी संबंधित देशातल्या सर्व स्थळांना भेट देऊन बांगलादेशमार्गे म्यानमारला
रवाना होईल. सात हजार २५० किलोमीटरच्या या प्रवासात, रस्ते
सुरक्षा याविषयावर ठिकठिकाणी जनजागृती केली जाणार आहे.
****
कुंभमेळ्याअंतर्गत
शाही स्नानाचं दुसरं पर्व आज प्रयागराज इथं सुरु झालं. मौनी अमावस्येच्या पर्वावर होणाऱ्या या पवित्र स्नानासाठी गंगा, यमुना, सरस्वती
संगमावर भाविकांनी पहाटेपासून
गर्दी केली आहे. तीन
कोटी पेक्षा जास्त भाविक आज संगमावर स्नान करतील असा अंदाज आहे. एकोणपन्नास दिवस चालणाऱ्या या
कुंभ मेळ्याचा समारोप चार मार्चला होणार आहे. शाही स्नानाच्यावेळी संगम परिसरात चोख
सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री आज जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
जालना इथं सुरू असलेल्या पशूपक्षी प्रदर्शनाचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप
होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी बक्षीस वितरणही होणार आहे.
****
लाच घेतल्याप्रकरणी बीड जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी
बी.एम.कांबळे आणि बीड तहसीलच्या पुरवठा विभागाचे अव्वल लिपिक महादेव महाकुडे यांना
न्यायालयानं, उद्या मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांना, पाच लाख रुपये
लाच घेताना परवा दोन फेब्रुवारीला रंगेहाथ पकडण्यात आलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment