आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१० फेब्रुवारी
२०१९ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. आंध्र प्रदेशातल्या
गुंटूर इथं पंतप्रधान विशाखापट्टणम तेलविहीरींच्या सुविधेचं, तसंच कृष्णा गोदावरी खोऱ्यात
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या वशिष्ठ विकास प्रकल्पाचं उद्घाटन करतील. तामिळनाडूमधल्या
तिरुप्पूर इथं राज्य विमा आयोगाच्या रुग्णालयाच्या कोनशिलेचं अनावरण, तसंच कर्नाटक
इथं भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान संस्थेच्याही कोनशिलेचं
अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
राजस्थानमधल्या
गुर्जर समुदायानं पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी रेल्वे पटरीवर सुरु केलेल्या आंदोलनामुळे
दिल्ली - मुंबई रेल्वेमार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सवाई माधोपूर जिल्ह्यात
मलराना डूंगर इथं चाळीस तासांपासून आंदोलक रेल्वे पटरी अडवून बसले आहेत. राजस्थान सरकारनं
गुर्जर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी सरकारशी
बोलणं टाळलं. गुर्जर समाज चार इतर समाजांसोबत विशेष मागासवर्गीयांमध्ये आरक्षणासाठी
पात्र असून, यासोबतच त्यांना इतर मागासवर्गीयांचाही लाभ मिळू शकतो.
****
उत्तरप्रदेशातल्या
प्रयागराज इथं सुरु असलेल्या कुंभमेळ्यात आज वसंतपंचमीच्या दिवशी तिसरं आणि अंतिम शाहीस्नान
होत आहे. सर्वच महत्त्वाच्या आखाड्यांच्या साधूंनी आज पहाटे त्रिवेणी संगमावर स्नान
केलं. या शेवटच्या शाहीस्नानासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. त्रिवेणी संगमावर
अंदाजे दोन कोटी भाविक पवित्र स्नान करण्याची शक्यता प्रयागराज मेळा प्राधिकरणानं व्यक्त
केली आहे.
****
भारत
आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघादरम्यान हॅमिल्टन इथं सुरु असलेल्या तिसऱ्या आणि
शेवटच्या टी ट्वेंटी सामन्यात न्यूझीलंडनं भारतासमोर १६२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
****
No comments:
Post a Comment