आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात
आज सकाळपर्यंत २५ दशांश ५ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. शहरातही काही भागांत हलक्या
सरी पडल्या, तर काही भागांत जोरदार पाऊस झाला. अहमदनगर जिल्ह्यातही काल जोरदार पावसानं
हजेरी लावली. या पावसात अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावर एका बसवर झाड पडल्याची घटना घडली.
यामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.
****
नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात सर्वाधिक शंभर
मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातल्या २४ जल प्रकल्पांतल्या पाणी साठ्यात
वाढ झाली असून, नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची पाणी पातळी ५५ टक्क्यांपर्यंत
पोहोचली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शेतामध्ये मक्याच्या पिकावर फवारणी करीत असताना १२
महिलांना विषबाधा झाल्याची घटना काल संध्याकाळी जळगाव जवळ वावडदा इथं घडली. या महिलांना
उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मानवानं चंद्राच्या पृष्ठभूमीवर
पहिलं पाऊल ठेवण्याच्या ऐतिहासिक घटनेला आज पन्नास वर्षं पूर्ण होत आहेत. यानिमित्त
औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रात
दोन दिवसांपासून चांद्र महोत्सव साजरा केला जात आहे. या उपक्रमात काल जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारी पवनित कौर यांनी भारताच्या चांद्रयान - दोन मोहिमेतील अवकाशयानाच्या
प्रतिकृतीचं अनावरण केलं. या महोत्सवाचा आज समारोप होणार आहे.
****
पुढील महिन्यात
वेस्ट इंडीजशी होणाऱ्या सामन्यांसाठी, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची निवड करण्यासाठी
मुंबई इथं आज निवड समितीची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी माजी कर्णधार आणि क्षेत्ररक्षक
महेंद्रसिंग धोनीनं आपण या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे. सैन्यात प्रशिक्षण
घेण्यासाठी दोन महिन्यांची सुट्टी घेणार असल्याचं कारण त्यानं दिलं आहे. धोनी हा प्रादेशिक
सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल आहे.
*****
***
No comments:
Post a Comment