आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
पत्रकारिता क्षेत्रातल्या योगदानाबद्दल २०१६, २०१७ आणि २०१८
साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता
पुरस्कार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत होणाऱ्या समारंभात वितरीत
केले जाणार आहे. विजय फणशीकर, रमेश पतंगे, पंढरीनाथ सावंत यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात
येणार आहे. प्रत्येकी १ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. याशिवाय राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय पत्रकारिता, छायाचित्रकार,
दूरचित्रवाणी वाहिनीवरील वृत्तकथा आदी पुरस्कारांचे वितरण या समारंभात
होईल. यावेळी ‘महाराष्ट्र
माझा शेतकरी राजा’ लघुचित्रपट स्पर्धा २०१६ आणि ‘महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा’ २०१७ आणि २०१८ मधल्या विजेत्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
****
विदर्भातील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार, माजी मंत्री तसंच जेष्ठ नेते मनोहर नाईक
यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याचं
स्पष्ट केलं आहे. आपल्याला भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी विचारणा केली असल्याचा
दावा त्यांनी केला आहे. आगामी विधान सभा निवडणुकीच्या
दृष्टीनं हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला असल्यानं इंद्रनील नाईक हे शिवसेनेच्या
वतीनं निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे.
****
पशुसंवर्धनाच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित
जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील १८ वर्षावरील अर्जदारांकडून ऑनलाईन अर्ज ८ ऑगस्ट पर्यंत मागविण्यात
आले आहे. अधिक माहितीसाठी तालुका
पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हा पशुसंवर्धन
अधिकारी यांनी केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment