Monday, 29 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९  जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज पाळला जात आहे. वाघांच्या संरक्षण-संवर्धन त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या सुरक्षेला प्रोत्साहन देण्याबाबत जनजागृतीसाठी हा दिवस पाळला जातो. आज या निमित्त नवी दिल्ली इथं आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्याघ्र संवर्धन विषयक कामाचा अहवाल जाहर करतील तसंच याबाबत चांगलं काम करणाऱ्या तामिळनाडूच्या सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाला पुरस्कार देऊन गौरवणार आहेत. राज्यात चंद्रपूर इथं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत अभिमान महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार असून यात राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम योजनेच्या पुरस्कारांसह वनश्री पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****

 सांगली इथं भारतीय स्टेट बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांची सुमारे ५० लाख रुपये रोकड एटीएममध्ये न भरता परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सीएमएस इन्फोसिस्टम लिमिटेड या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीला सांगली, मिरज तसंच जयसिंगपूर परिसरातल्या २४ एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी दिली होती. गेल्या सात वर्षात सांगली शहरात उघडकीस आलेला हा दुसरा एटीएम घोटाळा असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 इंडोनेशियात आयोजित २३व्या अध्यक्षीय मुष्टीयुध्द स्पर्धेत भारतानं सात सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं जिंकत सांघिक विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेत भारताच्या एम.सी. मेरी कोम हिनं काल, ५१ किलो वजनी गटाच्या झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलीयाच्या एप्रिल फ्रॅन्कवर पाच शून्यनं मात करत सुवर्ण पदक मिळवलं.
 बुलडाणा जिल्ह्यातल्या सावना इथल्या अनंता चोपडे यानं ५३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं.
*****

         मेळघाटात, हरिसाल इथल्या सिपना नदीला मोठा पूर आला असून, हरिसाल तसंच चिखली इथले रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत
*****
***

No comments: