Wednesday, 14 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.08.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१४ ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 देशाच्या त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्राला उद्देशून अभिभाषण करणार आहेत. आज संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी तसंच दूरदर्शनाच्या सर्व वाहिन्यांवरून राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचं थेट प्रसारण करण्यात येईल. त्यानंतर रात्री आठ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषांमधून अनुवाद प्रसारित होणार आहे.
****

 पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर आणि त्यात झालेल्या जीवित हानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. मात्र उद्या मुख्यमंत्री मंत्रालयात, तर राज्यपाल पुण्यात तिरंगा फडकवणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 कृष्णा वारणा आणि पंचगंगा या नद्यांना आलेल्या पुरामुळे बंद झालेली  सांगली - कोल्हापूर मार्गावरील वाहतुक आता सुरू झाली आहे. अंकली-मिरज हा रस्ताही वाहतुकीसाठी खुला झाला आहे. सांगली जिल्ह्यातील २२ मार्गावर एसटी वाहतुक सुरू करण्यात आली आहे, इतर मार्ग अद्याप बंद आहेत.
****

 भारत आणि वेस्ट इंडीदरम्यान सुरू असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज होणार आहे. हा सामना पोर्ट ऑफ स्पेन इथं खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सुरु होणाऱ्या या सामन्याचं धावतं वर्णन आकाशवाणीवरुन हिंदी आणि इंग्रजीमधून प्रसारित केलं जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता तर दुसरा सामना भारतीय संघानं ५९ धावांनी जिंकला होता. या सामन्यानंतर दोन्ही संघांमधे दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...