Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 August 2019
Time 1.00 to
1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ ऑगस्ट २०१९ दुपारी १.०० वा.
****
तिरस्कावर स्नेह
नेहमीच विजय मिळवत राहील, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते
आज थिंपू इथं रॉयल भूतान विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
भूताननं विश्र्वसमुदायाला प्रसन्नतेचा संदेश दिला असल्याचे गौरवोद्गारही पंतप्रधानांनी
यावेळी काढले.
भूतान सरकारचे मंत्री, संसद सदस्य तसंच वरिष्ठ अधिकारी या
कार्यक्रमाला उपस्थित होते. भूतानमधले विरोधी पक्ष नेते आज पंतप्रधानांची भेट घेणार
आहेत. भूतान नरेशांनी पंतप्रधान मोदी यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचं आयोजनही केलं
आहे.
****
मुंबईतल्या राजभवनाच्या आवारातल्या ‘जल किरण’ या
राष्ट्रपतींसाठीच्या विशेष अतिथीगृहाचं काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते
उद्घाटन झालं. राष्ट्रपती किंवा पंतप्रधान मुंबईच्या दौऱ्यावर असतील त्यावेळी, त्यांच्या
निवासाची सोय या अतिथीगृहात केली जाणार आहे. राजभवनच्या आवारात जतन केलेल्या दोन ब्रिटिशकालीन
तोफांसमोरच्या फलकाचंही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल अनावरण केलं. यावेळी राज्यपाल
सी विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद
तावडे उपस्थित होते.
****
भारत हा परंपरागत रित्या शिक्षणक्षेत्रातल्या नेतृत्वासाठी
तसंच शिक्षक तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि गेली हजारो वर्षे भारतीय शिक्षक हा विश्वगुरु
म्हणून ओळखला जातो असं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी
म्हटलं आहे. काल नवी दिल्ली इथं शिक्षकांच्या प्रशिक्षणा संबंधीच्या आंतरराष्ट्रीय
परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. `नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्यूकेशन` या
संस्थेच्या रौप्यमहोत्सवा निमित्त ही दोन दिवसीय परिषद घेण्यात येत आहे. प्रशिक्षण
देणारा जगातला सर्वात मोठा प्रकल्प केंद्रीय मनुष्यबळ विकास आणि साक्षरता विभाग सुरु
करणार असल्याची माहिती यावेळी या विभागाच्या सचीव रीना रे यांनी दिली.
****
राज्यातल्या पूरपरिस्थितीमुळे स्थगित झालेल्या मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला पुन्हा येत्या बुधवार पासून नंदुरबार इथून
सुरुवात होत आहे. नंदूरबार इथं बुधवारी २१ तारखेला सकाळी ११ वाजता या यात्रेत, मुख्यमंत्री जाहीर सभेद्वारे
नागरिकांशी संवाद साधतील. नंतर ही यात्रा धुळे आणि जळगाव इथं जाणार आहे. आणि त्यानंतर
शुक्रवारी बुलडाण्यातल्या मलकापूर इथं ही यात्रा पोहोचेल.
****
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त
नांदेड इथं साहित्य संमेलनाचं आयोजन सत्यशोधक
विचार मंच आणि जन्मशताब्दी महोत्सव समितीनं केलं असून येत्या शनिवारी २४ तारखेला हे
संमेलन होईल. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार असून
साहित्यिक प्राध्यापक डॉ. मच्छिंद्र सकटे यांचं बीजभाषण होणार आहे. साहित्यरत्न
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरातलं हे एकमेव साहित्य संमेलन
असेल. या संमेलनात अण्णाभाऊ साठे : साहित्य,
विचार आणि चळवळ या विषयावर परिसंवाद होणार असून कथाकथनाचा कार्यक्रम ही होणार आहे.
****
अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या सांगली आणि कोल्हापूर
जिल्ह्यातल्या महत्वाच्या ठिकाणी साचलेल्या
कचऱ्याची विल्हेवाट मुंबई महापालिकेच्या पथकानं लावली आहे. पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर सांगलीतल्या रहिवाशांना
पुन्हा नव्यानं उभं राहण्याची उमेद देत हे पथक आज सकाळी मुंबईत परतलं.
डॉक्टरांच्या पथकाबरोबरच घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या
सफाई कर्मचाऱ्यांचं पथकही सांगली, कोल्हापूरमध्ये गेल्या सोमवारी पोहोचलं. प्रत्येकी ५० कामगार असलेल्या मुंबई महापालिकेच्या
सात पथकांनी सात ठिकाणी सफाईच्या कामाला सुरूवात केली.
पहिल्याच दिवशी या पथकानं ५० मेट्रिक टन कचरा एकत्रित
करून त्याची विल्हेवाट लावत त्या परिसरात औषध फवारणी केली. त्यानंतर पाणी तुंबलेली
ठिकाणं मोकळी करण्यात आली. शहर स्वच्छ झाल्यानंतर जागा सोडून गेलेले सांगलीकरही आपापल्या
घरी परतू लागले आहेत.
****
मराठवाडा विभागात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यानं अनेक
ठिकाणी पेरणी केली गेलेली नाही. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे त्या तिथली पिकं पावसाच्या
खंडामुळे सुकत असल्याचं चित्र आहे.
****
माजी केंद्रीय मंत्री
स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्या पत्नी आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री सिंधूताई विखे पाटील यांचं आज पहाटे निधन झालं.
प्रवरानगर इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment