Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –18 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८
ऑक्टोबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
राज्यात एकवीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय
यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावं या करता जनजागृतीपर विविध उपक्रम राबवण्यात
येत आहेत. राज्यात एकूण आठ कोटी अठ्ठ्यान्नव लाख एकोणचाळीस हजार सहाशे मतदार आहे. विविध
राजकीय पक्षांचे नेते ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत.
****
भाजप अध्यक्ष
अमित शाह आज जालना इथं विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेणार आहेत. शाह यांच्या आज गडचिरोली, यवतमाळ इथंही प्रचारसभा
होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत प्रचारसभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी त्याच बरोबर काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य
शिंदे तसंच मल्लीकार्जून खरगे, आनंद शर्मा आदींच्याही राज्यात ठिकठिकाणी प्रचारसभा
नियोजित आहेत.
****
भारतीय
जनता पक्ष हा आपल्या नेत्यांच्या प्रचार मोहीमांमधे आडथळे निर्माण करत असल्याचा आरोप
काँग्रेस पक्षानं केला आहे. काँग्रस नेत्यांचे निवडणूक प्रचार दौरे, हवाई मार्गांमधे
तांत्रिक अडचणी निर्माण केल्या जात आहेत असं पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं
आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे काल
पासून सोलापुरमधे अडकून पडले असून, मोदींच्या नियोजित दौ-यांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी
कॉँग्रेसच्या नेत्यांना हवाई मार्गाची सेवा नाकारण्यात आल्याचा दावाही काँग्रेसचे प्रवक्ते
सावंत यांनी केला आहे.
****
सर्वोच्च
न्यायालयाचे सरन्यायधीश रंजन गोगोई यांनी न्यायमुर्ती एस ए बोबडे यांची सरऩ्यायाधीश
म्हणुन नियुक्ती करावी, अशी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. त्यासंदर्भातलं एक पत्र
काल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी कायदा आणि
न्याय मंत्रालयाला पाठवलं आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या सतरा नोव्हेंबरला
निवृत होतील.
****
भारत जगात
सर्वाधिक वेगानं विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेत असून याला अधिक मजबूत करण्याचा
प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या आर्थिक विकासाच्या दरात घट झाल्याचा अंदाज व्यक्त
केला आहे पण देशाची अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत असल्याचं अर्थमंत्री वाशिंग्टनमध्ये
पत्रकारांशी बोलत होत्या. भारत आणि चीनचा आर्थिक विकास दर सहा पूर्णांक एक
दशांश टक्के राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं नुकतेच प्रसिद्धीस दिलेल्या
अहवालात व्यक्त केला असल्याचं त्यांनी सांगितलं. जगातील सर्व अर्थव्यवस्थांमध्ये
विकासदरात घट होईल असा अंदाज नाणेनिधीनं व्यक्त केला असल्याचंही अर्थमंत्री सितारामन
यावेळी म्हणाल्या.
****
पंजाब
आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेधारकांना रिझर्व बॅंकेने घातलेली ठराविक रक्कम
काढण्याची अट रद्द करावी, यासाठी खातेधारकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनवाईला सर्वोच्च
न्यायलयानं नकार दिला असून यासंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले आहेत.
सरन्यायधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं आज या संदर्भातील निर्देश
जारी केले आहेत.
दरम्यान,
सरकार या प्रकरणी गंभीर असून, सक्तवसुली संचालनालय गुन्हेगारांविरोधात योग्य ती कारवाई
करेल असं सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलं आहे
****
राष्ट्रवादी
काँग्रस पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुंबईत सक्तवसुली
संचालनालयातर्फे चौकशी सुरू आहे. सक्तवसुली संचालनालयानं पटेल यांना चौकशीसाठी हजर
राहण्यासंदर्भात काल नोटीस बजावली होती. कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्यासह कथित
व्यवहाराप्रकरणी ही चौकशी सुरू आहे.
****
नांदेड
शहरात मतदार जागृती अभियानांतर्गत `मी मतदान करणार` अशी स्वाक्षरी मोहिम सुरू करण्यात
आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला.
नांदेड शहरात मतदार जागृती अभियान अंतर्गत वीस जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या
अधिकाधिक समाजसेवी संस्थानी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन
जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केलं आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातमधे हिवरा पाटी तपासणी नाक्यावर स्थिर तपासणी पथकानं
एक लाख पासष्ट हजार रूपये किमतीची अवैध दारू जप्त केली आहे. सदर दारू साठा एका खाजगी वाहनातून नांदेडहून कळमनुरीकडे आणली जात होती. अवैध
मद्याची पंचावन्न खोकी यावेळी ताब्यात घेण्यात आली असून पुढील कारवाई सुरू असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment