आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०५ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यातील राजकारण
बदलत असून मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होईल, अशी प्रतिक्रीया राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात
शिवसेना नेते संजय राऊत यांनी नोंदवली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आपला
पक्ष न्यायाच्या लढाईत विजयी होईल, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याचा निर्णय
राज्यातच होईल, राज्यात लवकरच सत्ता स्थापन
होईल, असंही त्यांनी सांगितलं. शपथ ग्रहण कोणाची मक्तेदारी नाही, राज्यातील जनतेच्या
मनाप्रमाणेच होईल आणि अपक्षांची यात महत्त्वाची भूमिका असेल, असं राऊत यांनी यावेळी
म्हटलं.
****
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर असून अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसाणीची ते पाहणी करत
आहेत. ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यात लोहा आणि कंधार, लातूर जिल्ह्यात अहमदपूर, परभणी
जिल्ह्यात गंगाखेड तसंच बीड जिल्ह्यात माजलगाव आणि गेवराई तालुक्यात अतिवृष्टीमुळे
झालेल्या पीक नुकसानाची पाहणी केली आहे.
****
अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्यानं सांगली जिल्ह्यात
जेमतेम तीन महिने ऊस गळीत हंगाम चालेल, असं चित्र आहे. या भागातल्या साखर कारखान्यांनी
ऊस तोडणी वाहतुकीचे करार पूर्ण केले आहेत. पण ऑगस्ट महिन्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठावर
आलेल्या महापुरामुळे जवळपास तीस टक्के ऊस नष्ट झाला आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यावर
आलेल्या अवकाळी पावसाने उसाबरोबरच द्राक्ष, डाळिंब, सोयाबीन आणि खरीप हंगामातल्या पिकांचं
नुकसान झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, बुलडाणा जील्ह्यात आलेल्या जोरदार अतीवृष्टी
आणी पुरसद्रुष्य परीस्थतीमुळं १५०० शेळ्या आणी मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. खामगाव
तालुक्यातील कोंटी परिसरातील या परिसराला भेट देऊन आमदार आकाश फुंडकर यांनी पाहणी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
खुलताबाद उर्साला आजपासून प्रारंभ होत
आहे. आज संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. बुधवार, गुरुवारी दोन दिवस विविध सांस्कृतिक,
धार्मिक कार्यक्रम यात होणार आहेत. कव्वाली, कुस्ती, मुशायरा आदींचा यात समावेश आहे.
उर्सानिमित्त औरंगाबाद शहरातून तीन
दिवस जादा शहर बस सोडण्यात येणार आहेत. शहागंज, मध्यवर्ती बसस्थानक, भगवान महावीर चौक
इथून या बस सोडल्या जाणार
आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment