Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 02 December 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०२ डिसेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
गेल्या
सरकारनं स्वतःच्या जाहिरातबाजीवर मोठा खर्च केल्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती अतिशय
बिकट झाली असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. संपूर्ण देशात येवढा
खर्च कोणत्याच राज्यात झाला नसून आता नव्या सरकारचे प्रमुख या संदर्भात बोलतील, असं त्यांनी यावेळी नमुद केलं. राज्यातील
एकूण निधीवर इथल्या जनतेचाच अधिकार असल्याचं त्यांनी सांगितंल. राज्यातील विविध नेते
शिवसेनेच्या वाटेवर असल्याचंही ते यावेळी म्हणाले. नव्या मंत्रिमंडळातील खाते वाटपासंदर्भात
सर्व निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार असल्याची माहितीही राऊत यांनी यावेळी दिली.
****
पीपल्स
गुर्रिल्ला आर्मीच्या आजपासून सुरु झालेल्या स्थापना सप्ताहाला हिंसक वळण देत नक्षलवाद्यांनी
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पुरसलगोंदी इथले पोलिस पाटील आणि राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या केली आहे. सशस्त्र नक्षलवाद्यांनी काल रात्री
पोलिस पाटील मासू पुंगाटी आणि कार्यकर्ते ऋषी मेश्राम या दोघांना पुरसलगोंदी गावातून
बाहेर नेऊन त्यांची हत्या केली. आज सकाळी पुरसलगोंदी-आलेंगा रस्त्यावर त्यांचे मृतदेह
आढळले. पुरसलगोंदीनजीकच्या सुरजागड पहाडावर एका कंपनीनं लोहखनिज उत्खननाचं काम सुरु
आहे. मध्यंतरी हे काम बंद होते. परंतु आता पुन्हा काम सुरु झालं आहे. नक्षलवाद्यांचा
त्याला विरोध असतानाही कंपनीनं उत्खननाचं काम सुरु केले असून, पोलिस पाटील पुंगाटी
आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मेश्राम यांनी या उत्खननाला समर्थन दर्शवलं
होतं, त्यामुळे त्यांची हत्या झाल्याची चर्चा असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे.
****
अहेरी
तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पचीही नक्षलवाद्यांनी नासधूस केली आहे. या ठिकाणी
वनविभागानं अनेक हत्ती पाळले असून, पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात. नक्षलवाद्यांनी
तिथं नासधूस केल्यानं पर्यटक भयभीत झाले असून आलापल्ली-भामरागड मार्गावर झाडे आडवी
टाकून रस्ताही अडवण्यात आला होता.
****
पोलिसांनी
या भागात अतीव दक्षतेचे आदेश जाहीर केले असून सर्वत्र मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
आजपासून
इंद्रधनुष या लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. केंद्र सरकार मार्फत राबवल्या जाणाऱ्या
या मोहीमेअंतर्गत घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलियो, क्षयरोग, कांजण्या, मेंदुज्वर
आणि काविळ या आजांरांना प्रतिबंध घालण्यासाठी गर्भवती महिला आणि २ वर्षांखालच्या बालकांचं
लसीकरण केलं जाणार आहे. याशिवाय काही ठराविक क्षेत्रांमध्ये जपानी मेंदुज्वर आणि फ्ल्यू
या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे.येत्या मार्च पर्यंत देशभरातल्या
सत्तावीस राज्यांमधल्या २७२ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये या मोहीमेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं होतं.
दरम्यान, अमरावती शहरामधील सर्व पालकांनी दोन वर्षाखालील बालकांचे संपूर्ण लसीकरण करून
घ्यावं तसंच गरोदर मातांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महानगरपालिका आयुक्त संजय
निपाने यांनी केलं आहे.
****
रत्नागिरी जिल्हयातल्या नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक येत्या एकोणतीस
डिसेंबरला होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय
अधिकारी विकास सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. इथल्या पालिकेत शिवसेनेचं
वर्चस्व असून गेल्या वेळेच्या थेट निवडणुकीत शिवसेनेचे राहूल पंडित निवडून आले होते.
त्यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्यानं ही निवडणूक होणार आहे. पंधरा प्रभागांमधल्या एकोणपन्नास केंद्रांवर शहरातले अठ्ठावण्ण हजार सातशे
सत्तर मतदार मतदान करू शकणार आहेत. निवडणुकीची मतमोजणी तीस डिसेंबर रोजी होईल.
****
अमरावती जिल्हात बावीस हजार हेक्टर क्षेत्रामध्ये रब्बी पेरणीला
सुरवात झाली आहे. परतीच्या पावसामुळे जमिनीत आद्रता वाढल्यामुळे यंदा रब्बीच्या हंगामात
क्षेत्र वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं सिंचनासाठी
पाणी उपलब्ध झाले आहे त्यामुळे यंदा गव्हाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालंदर
इथं झालेल्या राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरप्रित सिंग आणि सुमित कुमार यांनी
सुवर्ण पदक पटाकवलं. गुरप्रितनं ७७ किलो वजनी गटात संजन भानवल याचा ३- १ असा पराभव
केला.गुरप्रितचं हे चौथं राष्ट्रीय विजेतेपद आहे. ८७ किलो वजनी गटात सुनील कुमारनं
पंजाबच्या प्रभालवर ५-१ असा विजय मिळवला. या स्पर्धेत रेल्वे संघानं २१० गुणांसह पहिलं,
सेनादलानं १७० गुणांसह दुसरं, तर झारखंडनं १०९ गुणासह तिसरं स्थान पटकावलं.
****
No comments:
Post a Comment