Wednesday, 15 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 15.03.2017 10.00am


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१५ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

आज “जागतिक ग्राहक हक्क दिन” पाळला जात आहे. ग्राहकांमध्ये आपल्या हक्कांबद्दल जागृती व्हावी, या उद्देशानं पाळल्या जाणाऱ्या या दिनाची या वर्षीची संकल्पना “ग्राहक विश्वास ठेवू शकतील अशा डिजिटल विश्वाची उभारणी”, अशी आहे. १९८३ पासून हा दिवस जगभर पाळला जात असून, बाजारातील अपप्रवृत्ती आणि अन्यायाविरूद्ध ग्राहकांना कृती करण्यासाठी चालना देण्यात, या दिवसाचं योगदान हत्त्वाचं आहे.

****

त्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आज साजरी होत आहे. औरंगाबाद इथं क्रांती चौक परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यासाठी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच नागरिकांनी गर्दी केली आहे. या निमित्तानं पोवाडे, शिवचरित्र गायनासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

****

मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात प्रथमच सरकार स्थापन होत असून, एन बिरेन सिंह आज दुपारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नागा पीपल्स फ्रंट - एनपीएफ पक्षानं काल मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाला पाठिंबा असल्याचं सांगितलं. भाजपनं यापूर्वीच ३२ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर केलं होतं. पुरेसं संख्याबळ असल्यानं, सिंह यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केल्याचं, राज्यपाल हेपतुल्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

****

उत्तरप्रदेशचे माजी मंत्री समाजवादी पक्षाचे नेते गायत्री प्रजापती यांना लखनौमध्ये अटक करण्यात आली आहे. बहुचर्चित सामूहिक बलात्कार प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर, गेल्या सत्तावीस फेब्रुवारीपासून ते फरार होते.

****

जम्मू काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यात आत्ता सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू असून एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचं वृत्त आहे. तीन अतिरेक्यांना सुरक्षा दलानं घेरलं असून दोन्ही बाजूंकडून मोठा गोळीबार सुरू आहे.

//******//


No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 26 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 26 April -2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...