आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी
आजपासून देशभरात लागू झाला. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मध्यरात्री झालेल्या सोहळ्यात
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घंटानाद करून, ही करप्रणाली
लागू झाल्याचं सूचित केलं.
****
जीएसटीमुळे एक देश, एक कर,
एक बाजारपेठ ही रचना अस्तित्वात येऊन देशाच्या विकासात आमुलाग्र परिवर्तन होईल असा
विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत बोलत होते.
महाराष्ट्र सरकार अतिशय भक्कमपणे या प्रक्रियेच्या अंमलबजावणीत अग्रेसर राहील, असेही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेत विशेष आर्थिक देणग्या स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री
सहायता कक्षांतर्गत एक स्वतंत्र बँक खातं सुरू करण्यात आलं आहे. भारतीय
स्टेट बँकेच्या मुंबई मुख्य शाखेमध्ये चीफ मिनिस्टर्स फार्मर्स रिलिफ फंड या नावानं
बचत खातं उघडण्यात आलं आहे. या खात्यावर इच्छुकांना एन ई एफ टी अथवा धनादेशाच्या माध्यमातून
पैसे जमा करता येतील. ही रक्कम शेतकरी कर्जमाफी योजनेसाठीच उपयोगात आणण्यात येणार आहे.
****
राज्य शासन शाश्वत वीज देण्यासाठी कटीबध्द असून २०३० पर्यंत संपूर्ण राज्यात प्रत्येकाला सुरळीत,
सुरक्षित आणि शाश्वत वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची
माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट इथं उभारण्यात येणाऱ्या २२०
केव्ही उपकेंद्राचं भूमिपुजन काल उर्जामंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत
होते. १४६ कोटी रूपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्रामुळे लातूर जिल्ह्यातल्या
जळकोट, शिरूर अनंतपाळ, निलंगा, उदगीर परिसराला पुरेशा आणि योग्य दाबानं वीजपुरवठा होणार
आहे.
****
No comments:
Post a Comment