Tuesday, 8 August 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 08.08.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०८ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

राज्यसभेच्या गुजरातमधून रिक्त होणाऱ्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. भारतीय जनता पक्षातर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी तसंच काँग्रेसमधून बाहेर पडलेले बलवंतसिंह राजपूत हे तीन उमेदवार निवडणूक लढवत असून, काँग्रेसतर्फे पक्षाचे सरचिटणीस अहमद पटेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

****

सरदार सरोवरामुळे बाधीत झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी गेल्या १२ दिवसांपासून उपोषणावर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवलं आहे. पाटकर आणि इतर ११ कार्यकर्त्यांनी गेल्या बारा दिवसांपासून मध्यप्रदेशातल्या धार जिल्ह्यात चिखलदा इथं उपोषण पुकारलं आहे. या सगळ्यांची प्रकृती खालावल्यान त्यांना पोलिसांनी रुग्नालयात दाखल केल्याच पीटीआयच्या वृत्तात म्हटल आहे.

****

पत्रकारांची विश्र्वसनीयता सध्या पणाला लागली असून, आपली मतं दुसऱ्यांवर थोपवण्याची प्रवृत्ती वाढली असल्याचं मत, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी व्यक्त केल आहे. औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन संस्थेत आयोजित "इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जबाबदार पत्रकार'' या विषयावर ते बोलत होते. पत्रकारिता माध्यम जाहिराती की बातम्या या कात्रीत अडकलं असल्याचं सांगताना, जाहिरात आणि बातम्यांचा समतोल साधूनच या व्यवसायात तग धरता येतो, असं ते म्हणाले.

****

औरंगाबाद शहरातलं संत एकनाथ रंग मंदीर येत्या १५ ऑगस्ट पासून बंद ठेवून, दुरूस्तीचे काम सुरू करण्याचं आश्वासन महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिलं आहे. नाट्यमंदिराच्या दुरावस्थेसंदर्भात सामाजिक प्रसार माध्यमातून झालेल्या टीकेनंतर आमदार संजय शिरसाट यांनी नाट्यगृहाची पाहणी करून, दुरूस्तीसाठी आमदार निधीतून २० लाख रुपये देण्याची घोषणा केली. आमदार सतीश चव्हाण यांनीही महापौर भगवान घडामोडे यांना निवेदन देऊन नाट्यगृह दुरूस्तीची मागणी केली आहे.

****

राज्यातल्या 144 पोलिस उपनिरीक्षकांच्या गडचिरोली परिक्षेत्रात बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद पोलिस आयुक्तालयांतर्गत कार्यरत दहा तर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत दोन उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

*****


No comments: