आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१६ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
लहान मुलांना आत्महत्येला
प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल या धोकादायक ऑनलाईन खेळाच्या सर्व लिंक्स ताबडतोब हटवण्याचे
निर्देश केंद्र सरकारनं गुगल, फेसबूक, व्हॉट्सॲप, इन्सटाग्राम, मायक्रोसॉफ्ट आणि याहू
या कंपन्यांना दिले आहेत. कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या
सूचनेनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं या कंपन्यांना यासंदर्भात
पत्र पाठवलं आहे.
****
उत्तराखंडमधल्या मालपा इथं
ढगफुटीच्या घटनेतल्या मृतांची संख्या आता २५ वे पोहोचली आहे. यामध्ये सात जवानांचा
समावेश आहे. या भागातल्या अनेक व्यक्ति अजूनही बेपत्ता असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची
भिती वर्तवण्यात येत आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या उरी
सेक्टरमध्ये पाकिस्ताननं काल रात्रीच्या सुमारास शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी
झालेल्या गोळीबारात एक स्थानिक महिला जखमी झाली. या हल्ल्यात होणत्याही जीवितहानीचं
वृत्त नाही.
****
एयर इंडियानं सशस्त्र दलाच्या
कर्मचार्यांना आपल्या सर्व उड्डाणांमध्ये प्राधान्यक्रम देण्यास कालपासून सुरुवात केली.
एयर इंडियाच्या देशांतर्गत मार्गांवर या कर्मचार्यांना सवलतीच्या दरात तिकीट देण्याची
सुविधा यापूर्वीच करण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री
फेलोशिप कार्यक्रमातून तयार झालेले युवक समाजासाठी उत्तम काम करतील, असा विश्वास मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत सह्याद्री
अतिथीगृहामध्ये आयोजित मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात बोलत काल होते. चार हजार विद्यार्थ्यांमधून फेलोशिपसाठी फक्त ५० जण निवडण्यात आले असल्याचं
सांगून हे ५० जण प्रशिक्षणानंतर उत्कृष्ट कार्य करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केला.
****
गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.
उत्सवादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यभरात पोलिस यंत्रणा सतर्क होती. औरंगाबादसह
मराठवाड्यातही ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा झाला. अनेक ठिकाणी गोविंदा पथकांनी
मानवी मनोऱ्याचे नऊ थर लावत दहीहंडी फोडल्याचं वृत्त आहे.
****
No comments:
Post a Comment