Thursday, 1 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.03.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद



संक्षिप्त बातमीपत्र



1 मार्च   २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 जम्मू काश्मीरमधल्या बांदीपुरा जिल्ह्यात आज सकाळपासून दहशतवाद विरोधी अभियान राबवण्यात येत आहे. राज्य पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत लष्कर ए तय्यबाचा एक दहशतवादी ठार झाल्याचं राज्य पोलिस महानिदेशक एस पी वैद यांनी सांगितलं. चकमकीच्या ठिकाणी काही युवकांनी सुरक्षा बलाच्या जवानांवर दगडफेक केल्याचंही वृत्त आहे. 

****



 माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आज केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना काल चेन्नईतून अटक करण्यात आली होती. 

****



 वाईट आणि नकारात्मक बाबींचा नाश करत चांगल्या आणि सकारात्मकतेचा अंगिकार करण्याची संकल्पना असलेला होळीचा सण आज राज्यात उत्साहात साजरा होत आहे. संध्याकाळी ठिकठिकाणी होळी पेटवून पूजा केली जाईल.

****



 महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी एकूण १७ लाख, ५१ हजार, ३५३ विद्यार्थी बसले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परीक्षार्थींची संख्या घटली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. २४ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे.

****



 जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या पाथरवाला बुद्रुक इथं उसाचा ट्रक उलटून दोन मुलांचा मृत्यू झाला. काल संध्याकाळी ही घटना घडली. सदर ट्रक गोंदी इथून समर्थ सहकारी साखर कारखान्याकडे जात होता. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. ओंकार चोरमारे आणि सार्थक थेटे  अशी या मुलांची नावं आहेत.

****



 औरंगाबाद इथं आयोजित ५७व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत काल नाटक सादर होत असतांना त्यातल्या अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यु झाला. तापडीया नाट्य मंदीरात आयोजित या स्पर्धेत काल मुंबईच्या माझगाव डॉक स्पोर्टस क्लब संस्थेचं ‘जिसने लाहोर नही देखा’ हे नाटक सुरु असताना कलाकार विनायक राणे यांचा मृत्यु झाला. त्यांनी विविध नाटकं, मालिका आणि चित्रपटातून काम केलं आहे.

*****

***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اکتوبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 October-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبر...