आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२० ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
अहमदनगर
आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात होणारी आवक एक हजार घनफूट प्रतिसेकंद एवढी कमी
झाल्यानं, धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. सध्या धरणाच्या
उजव्या कालव्यातून ५०० घनफूट प्रतिसेकंद एवढा विसर्ग सुरू आहे.
****
कळंब तालुक्यातल्या गौर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये मतदानात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची प्राथमिक
शहानिशा करून तिथं झालेलं मतदान रद्द करण्यात आलं आहे. या प्रभागात
आता येत्या २७ तारखेला फेरमतदान होणार आहे. यासाठीचा सुधारित
निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
****
दीनदयाळ उपाध्याय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजिविका
अभियानाअंतर्गत ग्रामीण क्षेत्रांमध्ये स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून महिलांना सात
टक्के व्याजदरानं कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. भारतीय
रिझर्व्ह बँकेनं ही माहिती दिली. याअंतर्गत सर्व महिला बचत गटांना
दरवर्षी तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जांवर अनुदान मिळणार आहे.
****
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी
औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांर्तगत अधिकार वापरून खाजगी वाहनातून प्रवासी वाहतूक करण्याचे
आदेश दिले आहेत. एसटीच्या दरा प्रमाणेच शुल्क आकारून सेवा
देणाऱ्या या खासगी वाहतुकदारांना एसटी बसस्थानकावरून वाहतुक करता
येणार आहे. कामावर न येता प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार योग्य ती कारवाई करण्यात
येईल असा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे.
****
जालना रस्त्यावर एक ट्रक रस्ता दुभाजकावर धडकून झालेल्या
अपघातात दोन जण ठार तर ११ जण जखमी झाले. करमाडजवळील गोलटगाव फाट्याच्या
वळणावर हा अपघात झाला. एसटीचा संप असल्यानं खाजगी ट्रकमधून जवळपास
३० जण दिवाळीसाठी गावाकडे जात होते. जखमींपैकी एकाची प्रकृती
चिंताजनक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चार आणि पाच वर्गश्रेणी निर्यात कंपन्यांच्या सोन्याची
आयात करण्यास वाणिज्य मंत्रालयानं प्रतिबंध केला
आहे. या कंपन्यांना आता फक्त स्वत:च्या
वापरापुरतं सोनं आयात करण्याची परवानगी असेल. सोन्याच्या आयातीमध्ये
कपात करण्याच्या हेतूनं हे पाऊल उचललं असल्याचं वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी
सांगितलं.
****
No comments:
Post a Comment