आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
४ एप्रिल २०१८
सकाळी ११.०० वाजता
****
झारखंडच्या
लातेहार जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दल आणि पोलिसांची आज नक्षलवाद्यांशी चकमक होऊन
पाच नक्षलवादी मारले गेल्याचं वृत्त आहे. या चकमकीच्या स्थळावरून नक्षलवाद्यांच्या
तीन एके सत्तेचाळीस रायफल्स जप्त केल्याचं, तसंच ही चकमक अजूनही सुरू असल्याचं पीटीआयच्या
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातले हुतात्मा जवान शुभम मुस्तापूरे
यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. मुस्तापुरे यांचा पार्थिव
देह आज दुपारी बारा वाजेपर्यंत औरंगाबाद मार्गे परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात
कोनेरवाडी या त्यांच्या मूळगावी पोहोचवण्यात येईल. काल जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण
रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात मुस्तापुरे यांना वीरमरण आलं होतं.
****
पत्रकार जे.डे.
खून प्रकरणाचा निकाल मुंबईच्या विशेष मकोका न्यायालयानं येत्या दोन मे पर्यंत राखून
ठेवला आहे.११ जून २०११ला पत्रकार ज्योतिर्मय डे यांची पवई इथे हत्या झाली होती, कुख्यात
गुंड छोटा राजन या प्रकरणामध्ये एक आरोपी आहे.
****
मुंबईतल्या
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या तीन आरोपींच्या
याचिकांवर उत्तर देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला येत्या चोवीस तारखेपर्यंतची
मुदत दिली आहे. ज्या कायद्यांतर्गत या आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली, त्या
कायद्याच्या वैधतेला या आरोपींनी आव्हान दिलं आहे.
****
शेती व्यवसायाला
नवसंजीवनी देणारी, किसान ऊर्जा सुरक्षा तथा उत्थान महाअभियान, अर्थात कुसुम, ही योजना
लवकरच कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याचे
सचीव आनंदकुमार, यांनी दिली आहे. या योजनेमध्ये, पडित जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले
जाणार असून, त्यातून शेतकऱ्यांना एकरी चाळीस ते साठ हजार रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न
मिळू शकेल.
****
एकविसाव्या
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला आज ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट इथे सुरुवात होत आहे.
भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता या स्पर्धेचं उद्घाटन होईल. या सोहळ्यात बॅडमिंटन
खेळाडू पी.व्ही.सिंधू भारताची ध्वजवाहक असणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment