आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१९ एप्रिल
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद मोदी आज लंडनमध्ये
सुरु होणाऱ्या राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. अधिक
प्रगत, सुरक्षित आणि शाश्वत भविष्यासाठी राष्ट्रकुल देशांपुढच्या समान
आव्हानांवर मात करण्याच्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
दरम्यान, काल रात्री लंडनमध्ये झालेल्या ‘भारत
की बात’ सब के साथ’ या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी, भारत कधीही दहशतवाद
खपवून घेणार नाही, दहशतवादी कारवाया घडवणाऱ्यांना
चोख प्रत्युत्तर देईल, असं स्पष्ट केलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते
वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज मराठवाड्यातल्या नांदेड, बीड आणि परभणी जिल्ह्यांच्या
दौऱ्यावर येत आहेत. या भेटीत ते ५७ हजार ६७१ कोटी रूपयांच्या राष्ट्रीय महामार्गांच्या
कामांचा शुभारंभ करणार आहेत. नांदेड इथं ते विकास कामाचं भूमीपूजन करतील. परभणी आणि
जालना जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग आणि विविध विकास कामांचं ई-भूमीपूजन, तसंच
लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला माहिती अधिकाराच्या
कार्यक्षेत्रात आणण्याची सूचना, विधी आयोगानं केली आहे. काही करांपासून मुक्ती, आणि
शासनाकडून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला निधी मिळत असल्यामुळे राज्यघटनेत अभिप्रेत
असलेल्या राज्याच्या संकल्पनेत क्रिकेट नियामक मंडळ येत असल्यामुळे त्यांना माहितीचा
अधिकार लागू करावा, असं विधी आयोगानं जाहीर केलेल्या अहवालात म्हंटलं आहे.
****
२०१७ मध्ये
हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांनी
खर्चाचा हिशोब विहित कालावधीमध्ये सादर न केल्यामुळे, एकूण २११ उमेदवारांना पाच वर्षाकरता
उक्त सदस्य म्हणून राहण्यास, किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात
आल्याचं, हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं
आहे. त्यात हिंगोली तालुक्यातल्या सदूसष्ठ, कळमनुरी तालुक्यातल्या ५२, सेनगाव तालुक्यातल्या
१४, औंढा नागनाथ तालुक्यातल्या ३८, तर वसमत तालुक्यातल्या ३९ उमेदवारांचा समावेश आहे.
*****
***
No comments:
Post a Comment