Friday, 19 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.10.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९  ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी शिर्डीत काही  दाखल झाले आसून त्यांनी प्रथम साईमंदिरात जाऊन साईबाबांचं दर्शन घेतल आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अडीच लाख घरकुलांमध्ये त्यांच्या उपस्थितीत  आज ई - गृहप्रवेश होणार आहे. साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारोहात सहभागी होऊन पंतप्रधान साईबाबा विश्वस्त संस्थेच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज करणार आहेत. याशिवाय शताब्दी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या चांदीच्या नाण्याचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार आहे.

****



 बारावी आशिया युरोप बैठक काल बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथे सुरू झाली. या बैठकीत युरोप आणि आशियातल्या एक्कावन्न देशांचे प्रमुख भाग घेत आहेत. उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू भारताचं प्रतिनिधीत्व करत आहेत. ‘जागतिक आव्हानांसाठी जागतिक भागीदारी‘ हे या बैठकीचं घोषवाक्य आहे.

****



 केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राजस्थानच्या बिकानेर इथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दसऱ्या निमित्त करण्यात येणारी शस्त्रपूजा केली. यावेळीला त्यांनी भारताच्या प्रत्येक  नागरिकाला या जवानांचा अभिमान वाटतो,  अशा शब्दात या जवानांच्या देशकार्याची प्रशंसा केली. भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

****

 नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी रेल्वे स्थानकावर विविध तांत्रिक कामं करण्यात येणार असल्यामुळे आज पासून सोमवार पर्यंत मनमाड कुर्ला एक्स्प्रेस आणि गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत, असं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे.

****



 ऑडेन्स इथे सुरू असलेल्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांत, समीर वर्मा आणि सायना नेहवालनं आपापल्या गटाच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला दुहेरीमध्ये अश्विनी पोनप्पानंही आपली जोडीदार एन्सीकी रेड्डीसह उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

****



 मस्कत इथे सुरू असलेल्या आशियायी हॉकी चँपियन्स चषक स्पर्धेत भारतानं विजयी सुरुवात केली आहे. गतविजेत्या भारतीय संघानं ओमानला काल ११-० असं सहज पराभूत केलं.

*****

***

No comments: