Thursday, 13 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE- 13.02.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१३ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
बीड इथं आज पहिलं वृक्ष संमेलन होत आहे. सह्याद्री देवराई परिसरात होत असलेल्या या दोन दिवसीय आगळ्या वेगळ्या संमेलनात आज आणि उद्या निसर्ग आणि पर्यावरण या विषयावर राज्यभरातले विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. काल या संमेलनानिमित्त बीड इथं वृक्षदिंडी काढण्यात आली. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि लेखक अरविंद जगताप यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी एक वडाचं झाड आहे.
****
`प्रत्यक्ष कर : विवाद से विश्वास`  विधेयक २०२० मध्ये बदल करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. विविध न्यायाधिकरणात प्रलंबित असलेल्या कर्जाच्या पुनर्प्राप्ती संदर्भातल्या प्रकरणांना देखील यात समाविष्ट केलं जाणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. 
****
आज जागतिक रेडिओ दिवस आहे. रेडिओबद्दल समाजात जागृती होण्यासाठी तसंच या माध्यमातून धोरणकर्त्यांच्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोचावी, म्हणूनही हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. `रेडिओ आणि विविधता` ही या वर्षीची संकल्पना आहे. आजचा दिवस रेडिओ दिवस म्हणून साजरा करावा ही युनेस्कोची घोषणा २०१३ साली संयुक्त राष्ट्र संघानं अधिकृतरित्या स्वीकारली.
****
ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आजचं मानवी जीवन एका बाजूनं सुधारलं आहे, परंतु संस्कार, संस्कृती, मूल्यांच्या दृष्टीनं दुसरी बाजू कमकुवत होत चालली असल्याची खंत लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी व्यक्त केली आहे. ते काल नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ललित प्रयोगजीवी कला संकुलाच्या वतीनं आयोजित विभागीय लोक कलावंतांच्या मेळाव्यात बोलत होते.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आजापसून राज्यस्तरीय सातवी ‘महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२०’ क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत राज्यातील सतरा विद्यापीठाच्या कर्मचारी संघांनी सहभाग घेतला आहे. येत्या वीस तारखेपर्यंत ही स्पर्धा चालणार असल्याची माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी दिली.
****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 08 جولائی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 08 July 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...