आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० जानेवारी २०१८ सकाळी
११.०२
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची
आज सत्तरावी पुण्यतिथी. १९४८
साली या दिवशी गांधीजींची हत्या झाली
होती. गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात आज प्रार्थना सभांचं
आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींना आदरांजली अर्पण केली आहे. देशाला स्वातंत्र्य
मिळवून देणारे महात्मा गांधी आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांचा देश सदैव ॠणी राहील, असं
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. गांधीजींच्या जीवनातून प्रत्येक भारतीयानं
प्रेरणा घ्यावी, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे, तर राष्ट्रसेवेत बलिदान दिलेल्या
प्रत्येकाला नमन करत असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
न्यूझीलंड
मध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य सामन्यात भारतानं
पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आज झालेल्या सामन्यात
भारतानं पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव केला. पहिले फलंदाजी करत भारतीय संघानं पाकिस्तान
समोर २७३ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या
६९ धावांतच सर्वबाद झाला. येत्या तीन फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर
ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल.
****
राज्यातल्या ३६ माथाडी मंडळांचं एकत्रीकरण करुन महामंडळ
स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णया विरोधात राज्यातल्या सर्व माथाडी कामगारांच्या
वतीनं आज लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. नवी मुंबई इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज राज्यभरातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार
समित्याही बंद राहणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या वैरागड गावात,
लोकसहभाग आणि डॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानच्या माध्यमातून सॅनेटरी नॅपकिन व्हेडींग
मशीनची सुरूवात करण्यात आली आहे. या माध्यमातून केवळ पाच रुपयात पॅड उपलब्ध करून देण्यात
येत आहे. गावातल्या महिलांचं जीवनमान उंचवावं यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
*****
***
No comments:
Post a Comment