Monday, 8 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०८ जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 लोकसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी या सरकारच्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प सादर केला. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध सुधारणा विधेयक २०१९ तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणा सुधारणा विधेयक २०१९ ही दोन विधेयक लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता असून, राज्यसभेत आज दंतवैद्यक सुधारणा विधेयक तसंच आधार आणि इतर कायदे सुधारणा विधेयकावर चर्चा होणं अपेक्षित आहे.
****

 नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या ४८ तासानंतर पावसाचा काहीसा जोर ओसरला आहे. गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातही आठवडाभरातल्या पावसामुळे भंडारदरा तसंच मुळा धरण क्षेत्रातले लहानमोठे जलप्रकल्प ओसंडून वाहत आहेत.

 सांगली जिल्ह्याच्या वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा चौथ्यांदा अतिवृष्टी झाली. या भागात गेल्या २४ तासात १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
****

 आषाढी वारीसाठी टाळ, मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज अनुक्रमे माळशिरस आणि अकलूज मुक्कामाहून मार्गस्थ होत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विझोरी-ज्ञानेश्वरनगर मार्गे वेळापूर इथं तर तुकाराम महाराजांची पालखी माळीनगर इथलं उभं रिंगण झाल्यावर बोरगाव इथं मुक्कामी पोहोचेल. 
****

 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताचा उद्या न्यूझीलंड सोबत पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे.
*****
***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 24 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 24 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...