आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
७ एप्रिल
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जागतिक आरोग्य संघटना - डब्ल्यु
एच ओचा स्थापना दिवस आज जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जात आहे. आरोग्याप्रती
माहिती आणि जनजागृतीचा प्रचार करणं हे या दिनाचं मुख्य उद्दीष्ट असून, या
दिवशी जगभरातल्या नागरिकांना उत्तम आरोग्याच्या माध्यमातून जीवनशैली सुदृढ बनवण्यासाठी
प्रोत्साहन दिलं जातं. ‘सार्वभौमिक आरोग्य कवच, सर्वांसाठी
प्रत्येक ठिकाणी’ अशी यंदाच्या आरोग्य दिनाची संकल्पना आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या सोबत प्रतिनिधी
मंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांच्या हितसंबंधांच्या दृष्टीनं विविध विषयावर
यावेळी चर्चा होणार आहे. दोन्ही नेते नवी दिल्लीतून रिमोट कंट्रोलच्या सहाय्यानं बीरगुंज
इथल्या एकात्मिक तपास चौकीचं उद्घाटन करणार आहेत. नेपाळच्या परसा जिल्ह्यामध्ये असलेली
ही तपास चौकी अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असून, भारत
सरकारला सहाय्य करण्यासाठी ती तयार करण्यात आली आहे.
****
परदेशातल्या विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी
प्रोत्साहित करण्यासाठी येत्या १८ तारखेला स्टडी इंडिया कार्यक्रमाची सुरुवात करणार
असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. पुणे
इथं इंटर नॅशनलायझेशन ॲट होम या आंतरराष्ट्रीय परिषदेत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून ते उपस्थितांशी संवाद साधत होते. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात देशातल्या
१६० शिक्षण संस्थांमध्ये विविध ३० देशातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असं
त्यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी गारांसह अवकाळी पाऊस
झाला. लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यासह किल्लारी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा
पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं, संताळा इथं वीज पडून एक
बैल ठार झाला.
या गारपीटीमुळे बहरात असलेल्या आंब्याचं नुकसान झालं.
बाजार समिती मध्ये विक्रीसाठी आणलेला हरबरा, तूर, चिंच आदी शेतमाल भिजल्यानं, शेतकऱ्यांसोबतच
आडत व्यापाऱ्यांचंही नुकसान झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या
तुळजापूर तालुक्यात सलगरा दिवटी, उमरगा तालुक्यातल्या नारंगवाडी, माडज, लोहारा भागात,
तसंच नांदेड जिल्ह्यात देगलूर, मुक्रामाबाद परिसरातही काल पाऊस झाला.
*****
***
No comments:
Post a Comment