आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
८ एप्रिल
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यभर आजपासून १४ एप्रिलपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर
सामजिक सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून, त्यानिमित्त राज्यातल्या सर्व प्रशासकीय
विभागाच्या कार्यालयाकडून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहाचं
आज राज्यभरात एकाचवेळी उद्धाटन होणार आहे.
****
अर्थव्यवस्थेत सुधारणा तसंच
विविध क्षेत्रात परिवर्तन घडवून आणल्याबद्दल उपराष्ट्रपपती एम व्यंकया नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा
केली आहे. ते काल दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. मोदी
यांच्या नेतृत्वामुळे विकास कामाला वेग आला असल्याचं ते म्हणाले. आपल्या
देशावर अनेकांनी हल्ले केले परंतू भारतानं कोणत्याही देशावर हल्ला केल्याची इतिहासात
नोंद नसल्याचं नायडू यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यासह
विदर्भातल्या उद्योगांना यापुढे मुबलक विज उपलब्ध होण्यासाठी विशेष नियोजन करण्यात
येत असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं
एका कार्यक्रमात बोलत होते. मराठवाडा आणि विदर्भातले बंद उद्योग अॅमिनिटी योजनेअंतर्गत
सुरू करण्यालाही प्रोत्साहन देण्यात येत असून, यासाठी योजना जाहीर करण्यात येईल असही
ते म्हणाले. शेतकऱ्यांना सिंचनासाठीच्या विजेची मागणी सौर उर्जेद्वारे पूर्ण करण्याचा
महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला असून, २०२२ पर्यंत संपूर्ण कृषी पंप सौर उर्जेवर आणण्याठीची
मुख्यमंत्री सोलर कृषी फिडर योजना संपूर्ण देशात राबवण्याचा निर्णय केंद्र शासनानं
घेतल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
वैद्यकीय महाविद्यालयांच्या आवारात आयुर्वेदिक औषधांसाठी आवश्यक असणाऱ्या वनस्पतींच्या
पाच हजार झांडांची लागवड करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय
देशमुख यांनी दिली आहे. ते मुंबईत बोलत होते. वन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या १३ कोटी
वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत ही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. केरळ मध्ये आयुर्वेदिक
उपचाराला जाण्यापेक्षा कमी खर्चात राज्यातच ही सुविधा आता उपलब्ध होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड – अमृतसर एक्सप्रेस रेल्वेगाडी आज सकाळी साडेनऊ
ऐवजी दुपारी बारा वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या
वतीनं ही माहिती देण्यात आली.
*****
***
No comments:
Post a Comment