Saturday, 6 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून भाजपच्या देशव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी दीनदयाल उपाध्याय व्यापार सुविधा केंद्रामध्ये आयोजित समारंभात पाच हजार सदस्यांना संबोधित केलं. त्यांनी सर्व सदस्यांना या नव्या मोहिमेच्या सफलतेसाठी शुभेच्छा दिल्या. भाजप सदस्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य घरोघरी जाऊन सांगितले पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले. आव्हानं बघून घाबरून जाण्याची गरज नसल्याचं सांगून सर्वांच्या विकासाच्या स्वप्नासाठी सर्वांनी मेहनत करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 
                                ****

 २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प हा पुढील दहा वर्षांची दृष्टीकोणातून आणि पाच वर्षांचे लक्ष्य ठेऊन सादर करण्यात आला असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. हा अर्थसंकल्प हा अर्थव्यवस्थेच्या एकूण विकासावर भर देणारा असल्याचं त्या म्हणाल्या. व्यवहारिक आर्थिक धोरणं आणि उपाय योजनांचा अर्थव्यवस्थेला चांगला फायदा होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत असल्याचं सितारामन यांनी नमूद केलं. तसेच या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासा बरोबर नागरी उत्थानासाठीही अधिकच्या उपाय योजना करण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसाठी करण्यात आलेल्या ७० हजार कोटी रुपयांच्या तरतूदीमुळं त्यांना ग्राहकांना कर्ज देणे सुलभ होईल, असंही त्या म्हणाल्या.
****

 औद्योगिक संघटना, आर्थिक क्षेत्रातले तज्ज्ञ, अर्थ मंत्री आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. हा अर्थसंकल्प गूंतवणूकीच्या दृष्टीने फार मोठा उपक्रम असल्याचं ॲसोचॅमचे अध्यक्ष बी के 
गोयंका यांनी म्हटलं आहे. इ विवरण, आधार-पॅनची जोडणी, आणि डीजिटल पेमेंटसारख्या उपायांमुळे करदात्यांवर फार मोठा परिणाम झाला असल्याचं ते म्हणाले. अर्थसंकल्पातल्या झिरो-बजेट शेती मुळे लाखो शेतकऱ्याचा शेतीवर होणाऱ्या खर्चात बचत होणार असल्याचं नाबार्डचे अध्यक्ष एच के भनवाल यांनी म्हटलं आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प हा एकूणच अर्थव्यवस्थेच्या विकासासाठीची ब्लू प्रिंट असल्याचं बॉम्बे स्टॉक एक्चेंजचे मुख्य कार्यकारी आशिष चौहान यांनी म्हटलं आहे. उद्योग जगतामधील पिरामल ग्रुपचे अध्यक्ष अजय पिरामल आणि रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी देखील अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी उत्साहवर्धक असल्याचं म्हटलं आहे.  मात्र गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आदी गोदरेज आणि महिंद्रा हॉलिडेजचे अध्यक्ष अरुण नंदा यांनी अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे.
****

 एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवास दर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र बऱ्याच सवलत धारकांनी  अद्याप हे स्मार्ट कार्ड घेतलेलं नाही. सध्या शाळा, महाविद्यालयं सुरु झाली असून स्मार्टकार्ड अभावी विद्यार्थ्यांची तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी सवलत धारकांची गैरसोय होत असल्याचं निदर्शनास आल्यानं स्मार्ट कार्ड घेण्यास १ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल मुंबई इथं सांगितलं. गैरसोय टाळण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीच्या पासच्या आधारे तर इतर सवलत धारकांना प्रचलित ओळखपत्राच्या आधारे प्रवास सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचंही रावते यांनी सांगितलं.
****

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडीला काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या निवडणुकीत बेकायदेशीर मार्गांचा अवलंब झाल्याचा आरोप करत, पटोले यांनी निवडणूक आयोग आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांविरोधात ही याचिका दाखल केली आहे.
****

 धावपळीच्या आयुष्यात तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन नांदेडच्या जिल्हा परिषद अध्यक्षा  शांताबाई पवार जवळगावकर यांनी केलं आहे. राष्ट्रीय असंर्सगजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत नांदेड जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी जिल्हा परिषदेत काल करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. या आरोग्य्  शिबिरात पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण सहाशे एकोणतीस जणांची तपासणी  करण्यात  आली.
*****
***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 25 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...