आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०९ जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
मुंबईत काल रात्री झालेल्या
मुसळधार पावसानं रस्ते आणि रेल्वे वाहतुक मंदावली आहे. घाटकोपर, कांजूरमार्ग, सायन
आणि इतर काही ठिकाणी पाणी साठल्यानं मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेसेवेवरही प्रतिकूल
परिणाम झाला आहे.
दरम्यान पुढच्या चोवीस तासात मुंबई आणि उपनगरात मोठ्या पावसाची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
छत्तीसगढमध्ये पोलिसांसोबत
झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. सुकमा जिल्ह्यात आज सकाळी नक्षलविरोधी
मोहिमे अंतर्गत शोधमोहीम राबवत असताना, नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला.
त्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या गोळीबारात ही महिला नक्षलवादी मारली गेल्याचं,
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या कारवाई आणखी काही नक्षलवादी मारले गेल्याचा अंदाजही
या वृत्तसंस्थेनं वर्तवला आहे.
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे
निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज अनुक्रमे
वेळापूर आणि बोरगाव मुक्कामाहून पुढे मार्गस्थ झाल्या. ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज
ठाकूरबुवांची समाधी इथं तिसरं गोल रिंगण होऊन पालखी भंडीशेगाव इथं मुक्कामी पोहोचेल.
तुकोबांची पालखी आज सायंकाळी पिराची कुरोली इथं मुक्कामाला दाखल होईल.
****
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या
उपांत्य फेरीत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना खेळवला जाणार आहे.
भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजेपासून या सामन्याला सुरुवात होईल. उपांत्य फेरीचा
दुसरा सामना परवा गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात होणार आहे.
****
जालना जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार २८२ शेतकऱ्यांना
१८५ कोटी ९६ लाख रुपये खरीप पीककर्जाचं वाटप झालं आहे. पीककर्ज वाटपाचं हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या
फक्त बारा टक्केच असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना कर्ज वाटपाची गती वाढवण्याच्या
सूचना दिल्या आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment