Monday, 20 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 20.01.2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 January 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० जानेवारी २०२० दुपारी१.०० वाजता
****
तरुणांच्या कल्पनाशक्तीनेच देश प्रगती करू शकेल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. `परीक्षा पे चर्चा` उपक्रमांतर्गत देशभरातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत संवाद साधताना ते आज बोलत होते. हे दशक विद्यार्थी आणि देशासाठी अतिशय महत्त्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अपयशातूनच यशाचा मार्ग निघतो तसंच जग आता खूप बदललं असून संधींमध्ये खूप वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. नव्या तंत्रज्ञानाला स्वीकारा, मागं राहू नका आणि तंत्रज्ञानाचा आवश्यकतेनुसार उपयोग करावा, असं त्यांनी म्हटलं. नवी दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकुलात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचं हे तीसरं पर्व होतं. या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी परीक्षांमुळे येणाऱ्या ताणावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवावं याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसंच यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. अभ्यास करण्यासाठी दिवसभरातील योग्य वेळ कोणती, असा प्रश्र्न औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथल्या जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थीनी प्रेरणा मनवर हिनं यावेळी पंतप्रधानांना विचारला. 
आपल्या अभ्यासाची जबाबदारी स्वतःकडे घेऊन, त्यानुसार सवयींमध्ये बदल करावा, असं पंतप्रधानांनी तिला यावर सुचवलं.   
****
देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठता यावं म्हणून या प्रक्रियेतल्या सर्व संबंधितांशी समन्वयाची भूमिका सरकार बजावेल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...