Thursday, 11 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
११ जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 अमेरिकी संसदेने ग्रीन कार्ड जारी करण्यासंबंधीचे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीन कार्ड जारी करण्यासाठी प्रत्येक देशासाठी असलेली सात टक्के कोट्याची मर्यादा यामुळे संपुष्टात येणार असून, भारतातल्या माहिती तंत्रज्ञान शाखेत कार्यरत अनेकांना या निर्णयाचा लाभ होईल, अशी आशा वर्तवली जात आहे, या निर्णयाला अद्याप सिनेट सदस्यांची मान्यता मिळून त्यावर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा आहे. ग्रीन कार्डधारकाला अमेरिकेत कायमस्वरूपी राहून काम करण्याची परवानगी असते.
****

 गोवा विधानसभेतल्या दहा बंडखोर काँग्रेस आमदारांनी आज सकाळी वी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. या दहा आमदारांनी वेगळा गट स्थापन करून, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना कळवला आहे. त्यामुळे गोवा विधानसभेत भाजपची सदस्य संख्या १७ वरून २७ होईल.

रम्यान, आज गोवा सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणं अपेक्षित असून, सरकारमधल्या मित्रपक्षांच्या काही मंत्र्यांना अर्धचंद्र मिळण्याची शक्यता पीटीआयनं वर्तवली आहे.
****

देवशयनी आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पालख्या दिंड्या आज पंढरपुरात दाखल होत आहेत.

दरम्यान, उद्या पहाटे पंढरपूरला पांडुरंगाच्या शासकीय महापूजेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत अशी माहिती, शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी, या पुजेत ठाकरे यांच्या सहभागाबाबत आक्षेप घेतला होता. विठ्ठलाची शासकीय पूजा, मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते करण्याचा रिवाज असून ठाकरे यांच्या सहभागानं चुकीचा पायंडा पडेल, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं होतं.
****

 परिचर्या अभ्यासक्रमाला मान्यता नसताना प्रवेश देउन ६० विद्यार्थिनींची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद इथल्या जनहित परिचर्या महाविद्यालयाचा संस्थाचालक सुभाष पाटील याला काल पोलिसांनी अटक केली. त्यांना शुक्रवार पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्याय दंडाधिकारी एम. ए मोटे यानी दिले.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 22 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...