आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ जून २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरूवात होणार
असली तरी पुरेसं पाणी
तसंच जनावरांसाठी
चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी आणि टँकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूल
मंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत
पाटील यांनी काल मुंबईत दिली. राज्यात दुष्काळी निधीचं वाटपही सुरू असून आतापर्यंत
६७ लाख ४७ हजार ८३५ शेतकऱ्यांना चार हजार ४१९ कोटी रुपये वाटप करण्यात आल्याचं
पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा
अतिरिक्त कार्यभार आज सोपवण्यात येणार आहे. डॉ. शिंदे
हे मावळते कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडून औरंगाबाद इथं विद्यापीठात आयोजित समारंभात
पदभार स्वीकारतील. नव्या कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे
हा कार्यभार राहाणार आहे.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण - म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या तिसगाव, वाळूज, देवळाई आणि पैठण इथल्या गृहनिर्माण प्रकल्पांतल्या ९१७ सदनिकांसाठी आलेल्या
अर्जांची संगणकीय सोडत आज औरंगाबादमध्ये होत आहे. म्हाडाचे अध्यक्ष
उदय सामंत यांच्या हस्ते तापाडिया नाट्यमंदीरात ही सोडत होत आहे.
या सदनीकांकरता ७३३७ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून
सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावं म्हाडाच्या संकेतस्थळावर संध्याकाळी सहा वाजता जाहीर
केली जाणार असल्याचं म्हाडानं नमुद केलं आहे.
****
इंग्लंडमध्ये सुरू विश्र्वचषक क्रिकेट स्पर्धेत
भारतीय संघाच्या उद्या होणाऱ्या
पहिल्या सामन्यासह उर्वरित सामन्यांचं प्रत्यक्ष वर्णण आकाशवाणीवारून प्रसारित केलं
जाणार असल्याची माहिती प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती यांनी
दिली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment