Thursday, 6 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.06.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०६ जून  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 देशाच्या आर्थिक विकासात वृद्धी करण्यासह गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन नव्या मंत्रिमंडळ समित्या स्थापन केल्या आहेत. गुंतवणूक आणि आर्थिक विकासासंदर्भात स्थापन केलेल्या पाच सदस्यीय मंत्रिमंडळ समितीत गृह मंत्री अमित शाह , अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा समावेश आहे . रोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करण्याबाबत स्थापन केलेल्या दहा सदस्यीय समितीत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक,  पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल्य  आणि  रोजगार मंत्री संतोष गंगवार, नागरी विकास  मंत्री हरदीप पुरी यांच्यासह निर्मला सीतारामन,  पियुष गोयल आणि नितिन गडकरी यांचाही या समितीत समावेश आहे.
****

 केंद्र सरकारनं आठ मंत्रीमंडळ समित्यांचं पुनःस्थापना केली आहे. त्यात नियुक्तीसमिती, निवासविषयक समिती, आर्थिक व्यवहार, संसदीय कामकाज, राजकीय व्यवहार, सुरक्षा, गुंतवणूक आणि वृद्धी, तसंचरोजगार आणि कौशल्य विकास विषयक मंत्रीमंडळ समित्यांचा समावेश आहे. मंत्रीमंडळ सचीवालयानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे.
****

 कोयना आणि वारणा धरणात जलसंपदा विभागानं पाणीसाठ्यावर उपसाबंदी लागु केल्यानं सांगली, मिरज, वाळवा परिसरातील औद्योगिक क्षेत्रात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे. या निर्णयामुळं उद्योग क्षेत्रात तीव्र नाराजी पसरली आहे. कोट्यवधी रुपयांचं यामुळं नुकसान होईल, अशी भीती उद्योजक व्यक्त करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****

 जालना जिल्ह्यात आज सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असून जालना आणि बदनापुर परिसरात हलका पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद परिसरातही सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या सरी झाल्या.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...