Monday, 10 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.06.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१० जून  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 नामवंत नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं आज सकाळी बंगळुरु इथं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासुन ते आजारी होते. पद्मभूषण, पद्श्री, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ आदी   पुरस्कारांनी गिरीश कर्नाड यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनामुळं भारतीय साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक वतृळातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
****

 राज्याच्या विविध भागात काल मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळं तापमानात घट झाल्यानं लोकांची उष्म्याच्या त्रासातून काही अंशी सुटका झाली आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुणे, बारामती शहरांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. शिर्डीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळं विविध भागांतील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता. ग्रामीण भागात घरांची हाणी झाल्याचं तसंच झाडं उन्मळून पडल्याचं वृत्त आहे. सातारा जिल्ह्यात डोंगराळ भागांत झालेल्या पावसामुळं मुंबई - बंगळुरू दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची गंती मंद झाली आहे.
****

 येत्या दोन दिवसात अरबी समुद्रात पश्चिम सागरी किनाऱ्यांवर वादळाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. किनाऱ्यापासून ३०० किलोमीटर अंतरावर हे वादळ येईल असं राज्य, माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाने म्हटलं आहे.
****
 दुष्काळी भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जत तालुक्यातील शेतकऱ्यांची पायीदिंडी ७०० किलोमीटर प्रवास करत मुंबई मंत्रालयाकडे निघाली आहे. दरवर्षीच्या दुष्काळावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी असंख्य शेतकरी या दिंडित सहभागी झाले आहेत. ही दिंडी आज सांगली मिरज परिसरात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 कोल्हापूर ते बंगळुरू मार्गे मिरज बेळगांव राणी चन्नमा एक्सप्रेस  येत्या सात जुलै पर्यंत मिरजपर्यंत धावणार आहे. दुरुस्तीच्या कारणांमुळे मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गावरुन ही गाडी धावणार नाही.
*****
***

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 27 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 27 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...