आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०७ जून २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात
सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली
आहे. दक्षिण काश्मीरमधील पांजरण इथं ही चकमक झाली. मारले गेलेले दहशतवादी जैश – ए-
मोहम्मदचे सदस्य असल्याचं वृत्त आहे. सुरक्षा दलांनी पांजरण भागात दहशतवादी असल्याची
माहिती मिळाल्यानंतर या परिसराला काल संध्याकाळी घेराव घालून शोध मोहीम हाती घेतली
होती.
****
मालेगांव
स्फोट प्रकरणी सुनावणी करणाऱ्या मुंबईच्या विशेष न्यायालयानं साक्षीदार गैरहजर राहिल्याबद्दल
त्यांच्या नावे जामीनपात्र वारंट जारी केलं आहे. दिवसभरात केवळ एक साक्षीदार उपस्थित
राहिल्याबद्दल न्यायमूर्तीं व्ही. एस. पाडळकर यांनी राष्ट्रीय अन्वेषण विभागालाही फटकारलं
आहे. अशा वातावरणात गतीनं सुनवाई होऊ शकत नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. भाजपच्या खासदार प्रज्ज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट
कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह आठ जणांविरुद्ध मालेगांव स्फोट प्रकरणी खटला सुरू आहे.
****
रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पाव टक्के कपात केल्यामुळे
सुक्ष्म, लघू तसंच मध्यम उद्योगांना परवडणार्या दरात कर्ज मिळू शकेल, त्यामुळे भारतीय
अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल असं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी एका संदेशात
म्हटलं आहे.
****
केंद्रिय मंत्रिमंडळाच्या
समित्यांमधे सरकारनं बदल केले असून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना जास्तीत जास्त
समित्यांमधे स्थान दिलं आहे. परवा सरकारनं आठ मंत्रिमंडळ समित्यांचं पुनर्गठन केलं
होतं. त्यातल्या दोन समित्यांवर राजनाथ सिंग होते. आता आणखी चार समित्यांवर त्यांना
घेतलं असल्याचं मंत्रिमंडळ सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पांडाणे परिसरात आज सकाळी मृग नक्षाच्या
दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. पुणेगाव, काजीमाळे, फोफशी, दहीवी,
अंबानेर, पांडाणे परिसरात आज सकाळी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
**********
No comments:
Post a Comment