Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 04 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०४ एप्रिल २०२० दुपारी
१.०० वा.
****
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर राज्य सरकार गरीब आणि गरजुंच्या
मदतीसाठी आवश्यक ते सर्व उपाय योजत आहे. बृहण मुंबई महापालिकेनं काल पाच रुग्णालयं
कोरोनाबाधीतांच्या उपचारांसाठी राखीव ठेवत असल्याचं म्हटलं आहे. अन्य सहा रुग्णालयांना
अलगीकरण केंद्र बनवण्यात आलं आहे. मुंबईमध्ये `ताज`
समुहानं कोरोनाविरुद्ध
लढत असलेल्या डॉक्टरांसाठी आपली सेवा उपलब्ध करून दिली आहे.
****
लोक `लॉकडाऊन` गांभीर्यानं
घेत नसल्यानं त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात असं महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे
नेते राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत कोरोनाच्या मुद्दावर माध्यम
प्रतिनिधींशी बोलत होते. लोकांनी घरातच बसावं, असं आवाहनही त्यांनी केलं. लोक ऐकत नसल्यानं
`लॉकडाऊन` वाढवण्याची वेळ येऊ शकते,
असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या देशात असलेल्या
संभ्रमावस्थेबाबत बोलणं अपेक्षित आहे, दिवे घालवून काय होणार, असा प्रश्र्न ठाकरे यांनी उपस्थित
केला. राज्य सरकारनं लोकांचे प्रश्र्न नीट सोडवण्यासाठी योग्य यंत्रणा लावली पाहिजे
तसंच आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी
बोललो असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोग्य खात्यावर कमित कमी लक्ष दिल्यामुळे ही
परिस्थिती ओढावली असल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
****
अमरावती शहरातल्या एका पंचेचाळीस
वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला परवा दोन
तारखेला जिल्हा
सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी
या व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून या अहवालात त्याला कोरोनाची लागण असल्याचं
म्हटलं आहे. त्यामुळे ही व्यक्ती रहात असलेला हैदरपुरा परिसर अमरावती जिल्हा प्रशासनानं
प्रतिबंधित केला आहे.
****
मुंबईतल्या विक्रोळी इथल्या
झोपडपट्टीत आज कोरोनाचे तीन रुग्ण सापडले. त्यामुळे ही संपूर्ण झोपडपट्टी सील करण्यात आली आहे. या परिसरातल्या नागरिकांनी गरज नसताना बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
दिल्लीतल्या निजामुद्दीन इथं तबलीगी
जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नऊशे साठ विदेशी नागरिकांवर शासनानं प्रतिबंध घातला
आहे. आपत्ती प्रबंधन आणि विदेशी नागरिक कायद्याअंतर्गत या नऊशे
साठ जणांवर कडक कारवाई
करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सचिवांनी म्हटलं आहे. या लोकांना त्यांच्या मायदेशी लवकरात लवकर पाठवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्ध देशाच्या लढाईमध्ये
एकजुटता दाखवण्यासाठी जनतेला उद्या दीप प्रज्ज्वलित करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी आज
या संदर्भातील आपल्या एका संदेशात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता
`आओ फिर से दिये जलाए` ची चित्रफित जारी केली आहे.
****
जनधन
खात्यामध्ये जमा झालेले पाचशे
रुपये काढण्यासाठी जालना शहरातल्या काही बँकांसमोर महिला गर्दी करत आहेत. जालना इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घेण्यासाठी देखील नागरिक गर्दी करत आहेत. यामुळे भाजीपाल्याच्या ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांनीच
फक्त जालना बाजार समितीच्या
आवारामध्ये भाजीपाला खरेदी करावा, सामान्य नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असं आवाहन
कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे
करण्यात आलं आहे.
****
नांदेड
दक्षिण विधानसभा मतदार संघात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नयेत यासाठी आमदार मोहनराव
हंबर्डे यांनी भायेगाव, राहेगाव, किकी या तीन गावांमध्ये
आज निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करून घेतली.
****
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
यांनी अहमदनगर प्रशासनाला एन
९५ चे
५ हजार
`मास्क` तसंच इतर ५ हजार
`मास्क`, हातमोजे, वैयक्तिक साधसामुग्रीसह इतर सुरक्षिततेचं आवश्यक
असलेलं साहित्य
दिलं आहे.
संगमनेरमध्ये काल कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करत प्रशासनानं १८८ कलम
लावला असून संपूर्ण तीन दिवस संगमनेर शहरात आणि तालुक्यात
शंभर टक्के बंद करण्याचा
निर्णय घेतला आहे.
****
कोरोनाचं संकट
दूर ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातली कुडाळ नगर पंचायत वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती
करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुडाळ नगर पंचायतनं रस्त्यावर संदेश रेखाटन केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment