आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१८ नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी मुंबईत आगमन झालं.
राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचं विमानतळावर
स्वागत केलं. पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई आणि पुण्यात ४१ हजार कोटी रूपयांच्या पायाभूत
आणि गृह बांधणी प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात कल्याण
इथं ठाणे- भिवंडी -कल्याण आणि दहीसर- मीरा- भाईंदर या दोन मेट्रो प्रकल्पांचं भूमिपूजन
होणार आहे. कल्याण इथं जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करणार आहेत.
****
मुंबईतल्या इ एस आय
सी, अर्थात कामगार रुगणालयात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या
कुटुंबाला प्रत्येकी १० लाख रुपये, गंभीर
जखमींना दोन लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक
लाख रुपयांची मदत केंद्र सरकारनं जाहीर केली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री
संतोष कुमार गंगवार यांनी ही माहिती दिली. कामगार मंत्रालयाचे सचिव आणि
इ एस आयसीच्या महासंचालकांसह गंगवार आज कामगार रुगणालयाला भेट देवून मदतकार्याचा आढावा
घेतील, तसंच दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांची भेट घेतील. अंधेरीत
मरोळ इथल्या या रुग्णालयात काल संध्याकाळी लागलेल्या या आगीत सहा जणांचा मृत्यू
झाला असून, १४१ जण जखमी झाले आहेत.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पर्थ इथं झालेला दुसरा
कसोटी क्रिकेट सामना ऑस्ट्रेलियानं १४६ धावांनी जिंकला आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं
दिलेलं २८७ धावांचं लक्ष्य पार करताना भारताचा संघ १४० धावांवरच सर्वबाद झाला. चार
सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत. मालिकेतला तिसरा सामना २६
डिसेंबरपासून मेलबर्न इथं सुरू होणार आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या १० तालुक्यातल्या ४५ महसूली मंडळात
टंचाई घोषित करण्यात आली आहे. या मंडळांमध्ये शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अनुदेय
सवलती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात बार्शी- मुरुड राज्य मार्गावर मुरुड
अकोलानजीक भरधाव मोटार पुलाच्या कठड्याला धडकून १५ फूट खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात
पाच जण जागीच ठार तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. काल दुपारी हा अपघात झाला.
*****
***
No comments:
Post a Comment