आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५
नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना
आज चौऱ्याण्णवाव्या जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन करण्यात येत आहे. नवी दिल्ली इथं
उभारलेली सदैव अटल ही त्यांची समाधी आज राष्ट्राला
अर्पण करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान
नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी वाजपेयी यांच्या समाधीवर पुष्प
अर्पण करुन अभिवादन केलं. विविधतेत एकतेचा संदेश देणारी ही समाधी देशातल्या विविध ठिकाणाहून
आणलेल्या दगडांनी बांधण्यात आली आहे. राष्ट्रनिर्माणात अटलजिंचं योगदान अविस्मरणीय
असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर नवभारताच्या निर्माणाचं अटलजींचं
स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अटल बिहारी वाजयेयी यांची जयंती आज सुशासन
दिवस म्हणून साजरी करण्यात येत आहे.
****
येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ आज देशभरात साजरा
होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू राज्यपाल
सी. विद्यासागर राव यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळनिमित्त आज विविध चर्चमध्ये
प्रार्थना सभा घेण्यात आल्या.
****
पंतप्रधान नरेंद मोदी आज अअसाममध्ये ब्रम्हपुत्रा
नदीवर देशातल्या सर्वाधिक लांबीच्या रेल्वे पुलमार्ग बोगीबीलचं उद्घाटन करणार आहेत.
ते या पुलावरुन जाणाऱ्या पहिल्या रेल्वेद्वारे प्रवासही करणार आहेत. चार पूर्णांक नऊ
किलोमीटर लांबीच्या या पुलाखाली दुहेरी रेल्वे मार्ग तसंच वरच्या बाजुला तिहेरी रस्ता
मार्ग आहे. आसामच्या डिब्रूगढपासून हा पूल १७ किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे एकोणसाठ
कोटी रुपये खर्च करुन या पुलाचं निर्माण करण्यात आलं आहे.
****
औरंगाबादचा क्रिकेटपटू प्रज्वल घोडके याची राज्याच्या
तेवीस वर्षाखालील संघात निवड झाली आहे. त्यानं औरंगाबादकडून खेळतांना यावर्षी आठ सामन्यांत
एक शतक आणि तीन अर्धशतकांसह चारशे नव्वद धावा
केल्या होत्या तसंच, यष्टीरक्षण करत सव्वीस खेळाडूंना बाद केल्यानं प्रज्वल घोडकेची
निवड झाल्याचं औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेनं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment