Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 December
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ डिसेंबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात
राफेल विमान खरेदी व्यवहार आणि कावेरी नदीवर धरण बांधण्याच्या मुद्यासह विविध प्रश्नांवरून
गदारोळ झाल्यामुळे कामकाजात अडथळे आले. लोकसभेत सकाळी ११ वाजता सभागृह सुरू होताचं
काँग्रेस, अण्णाद्रमुक, तेलगु देसम पक्ष आणि डाव्या आघाडीच्या सदस्यांनी राफेल विमान
खरेदी व्यवहार प्रकरण आणि अन्य प्रश्नांवरून गदारोळास प्रारंभ केला. घोषणा देत ते हौद्यात
उतरले. त्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दुपारपर्यंत कामकाज स्थगित केलं. मात्र
१२ वाजेनंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं.
राज्य सभेतही कावेरी नदीवर
प्रस्तावित धरण बांधण्याच्या मुद्यासह विविध प्रश्नावरून सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे
सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
****
केंद्र
सरकारनं ‘थेट लाभ हस्तांतरण योजना’राबवून, ९० हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला,
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल हिमाचल प्रदेश सरकारच्या
वर्षपूर्तीनिमित्त धरमशाला इथं एका कार्यक्रमात बोलत होते. विधवा, वयोवृद्ध, आणि अपंगासाठीच्या
निवृत्ती वेतन योजनेतून सहा कोटी बोगस लोकांना पैसे मिळत होते. थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे
हा घोटाळा समोर आला असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘समान पद, समान वेतन’योजनेच्या नावाखाली
काँग्रेसनं जवानांची दिशाभूल केली, तशीच कर्जमाफीच्या नावाखाली ते शेतकऱ्यांची दिशाभूल
करत असल्याची टीकाही मोदी यांनी यावेळी केली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं भूतानचे पंतप्रधान लोतेय छेरिंग यांच्यासोबत चर्चा
करणार आहेत. छेरिंग हे काल, भारताच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. दोन्ही देशांमध्ये
औपचारिक राजनैतिक संबंध स्थापित होऊन 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचं
आयोजन करण्यात आलं आहे. भूतानचे पंतप्रधान या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद,
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, अर्थमंत्री अरुण जेटली, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू आणि
ऊर्जा मंत्री आर के सिंग यांचीही भेट घेणार आहेत.
****
रत्नागिरी
जिल्ह्यात दापोली - खेड मार्गावर झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला तर दोघे
जण जखमी झाले आहेत. एका वाहनाला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करणारी मोटारगाडी एका
डंपरला धडकल्यानं हा अपघात झाला. जखमींना मुंबईच्या केईएम रूग्णालयात दाखल करण्यात
आलं आहे.
जिल्ह्यात
घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत बस उलटून १५ शाळकरी मुलांसह ३५ जण जखमी झाले आहेत. ही बस
निवळीहून संगमेश्वरला जात होती. चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.
****
वाशिम
जिल्हावासीयांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या आकाशवाणीचं वाशिम केंद्र लवकरच
सुरू होणार असल्याची माहिती खासदार भावना गवळी यानी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली
आहे. जिल्ह्याला स्वतंत्र आकाशवाणीचं एफ एम केंद्र असावं अशी मागणी अनेक वर्षांपासून
होती.
****
राज्यात
थंडीचा कडाका वाढला असून मुख्यत:उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट जास्त होती नाशिक मध्ये
काल राज्यातलं सर्वात कमी पाच पुर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या
२४ तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट अनुभवास येण्याची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दरम्यान,
सातारा जिल्ह्यात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वाधिक
थंडी
महाबळेश्वर, पाचगणी परिसरात जाणवत आहे. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक तसंच गहू गेरवा
केंद्र परिसरातल्या स्ट्रॉबेरीच्या शेतातल्या पिकांवर काल सकाळी पडलेले दव थंडीमुळे
गोठल्याचे समोर आले. नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरसह पाचगणी परिसर पर्यटकांनी
फुलून गेला असून त्यात थंडी वाढल्यानं त्याचा सकारात्मक परिणाम व्यवसायवाढीवर होत असल्याचं
व्यावसायिकांचं मत असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितल आहे.
****
अहमदनगर
महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे बाबासाहेब वाकळे विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या पाठिंब्यावर भाजपाचे बाबासाहेब
वाकळे महापौरपदी विजयी झाले.
महापौर
पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केलेल्या संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे
घेतला. त्यामुळे भाजपचे वाकळे आणि शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांच्यात लढत झाली. वाकळे
यांना ३७ मते मिळाली. त्यात भाजपचे १४, राष्ट्रवादीची १८, बसपा चार अपक्ष एक अशा मतांचा
समावेश आहे. सेनेचे बोराटे यांना २३ मते मिळाली. उपमहापौर पदासाठी निवड सुरू आहे.
//************//
No comments:
Post a Comment