Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 16
July 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी
उद्या
हरियाणा,
चंदिगढ
आणि
पंजाबचा
दौरा
करणार
आहेत.
हरियाणातल्या
जिंद
रेल्वे
स्थानकावरुन
जिंद
आणि
सोनीपत
दरम्यान
धावणाऱ्या
देशातल्या
पहिल्या
हायड्रोजन
रेल्वेला
पंतप्रधान
हिरवा
झेंडा
दाखवणार
आहेत.
हायड्रोजन इंधनावर चालणारी ही
रेल्वे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करणार असून, पर्यावरणपूरक रेल्वे वाहतुकीच्या दिशेने भारताने उचललेले हे
ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. तसंच सुमारे १४
हजार
७००
कोटी
रुपये
खर्चाच्या
विविध
विकासकामांचं
लोकार्पण
करतील.
****
भारत आणि युरोपीय महासंघ
यांच्यातील तिसरी व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद ब्रुसेल्स इथं पार पडली. या बैठकीनंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी
भारत-ईयू भागीदारी अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त
केला. भारत-ईयू 'होरायझन युरोप' कार्यक्रमांतर्गत
भारताच्या सहभागासाठी वाटाघाटी सुरू करण्यास तसंच ईव्ही चार्जिंग
पायाभूत सुविधांच्या मानकांसाठी पहिलं नवोन्मेष केंद्र
स्थापन करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली, व्यापार, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात
सहकार्य वाढवण्यावरही यावेळी भर देण्यात आल्याचं जयशंकर
यांनी सांगितलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यावेळी उपस्थित होते.
****
रेल्वे तिकिट आरक्षण अधिक
सोपं व्हावं यासाठी IRCTC नं नवीन बिटा वेबसाईट सुरु केली आहे. या संकेतस्थळावर अनावश्यक
कॅपचा, पॉपअप्स, फ्लॅशिंग ग्राफिक्स किंवा इतर अडथळा आणणारे घटक नसतील. सर्व श्रेणीतल्या
जागांची उपलब्धता यावर दिसेल. तिकिट आरक्षणासाठीच्या आवश्यक टप्प्यांची संख्या कमी
होऊन, चेकआऊटची प्रक्रिया जलद होईल. तसंच या संकेतस्थळावर प्रवाशांची माहिती जतन केली
जाईल, त्यामुळे पुन्हा आरक्षण करताना प्रक्रिया सुलभ होईल. सध्याच्या संकेतस्थळाच्या
होम पेज वर देखील बिटा व्हर्जनची लिंक उपलब्ध आहे.
****
ओडिशात जगन्नाथ
पूरी
इथं
लाखो
भाविकांच्या
उपस्थितीत
जगन्नाथ
रथयात्रेला
आज
सुरुवात
झाली.
यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली
बहिण सुभद्रा आणि बंधु बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी
प्रस्थान करतात. नऊ दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम
असतो.
राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू,
उपराष्ट्रपती
सी
पी
राधाकृष्णन
आणि
पंतप्रधान
नरेंद्र
मोदी
यांनी
देशवासियांना
रथयात्रेच्या
शुभेच्छा
दिल्या
आहेत.
महाप्रभु
जगन्नाथाच्या कृपेनं देश आणि देशवासीयांच्या सुख समृद्धीत निरंतर वृद्धी होत राहो,
असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात
म्हटलं आहे.
हा
भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी आविष्कार आहे,
रथयात्रेशी संबंधित परंपरांनी भारत
आणि जगभरातील अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचं
पंतप्रधानांनी समाज
माध्यमावरच्या संदेशात
म्हटलं
आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काल
आढावा बैठक घेतली. संगणक आधारित परीक्षा ऑगस्ट २०२७ पासून लागू करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात
आला. परीक्षा प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक
आणि विश्वासार्ह करण्यावर यावेळी भर देण्यात आला असून,
परीक्षा आणि निकाल वेळेत लागण्यासाठीच्या सुधारणा टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा करताना विद्यार्थ्यांचं हित आणि प्रशासनाची तयारी या दोन्ही बाबींमध्ये समतोल राखण्याची
आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.
****
दिवंगत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश २०२६ मधल्या राष्ट्रपुरुष आणि थोर
व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागानं
यासंदर्भातलं अधिकृत परिपत्रक जारी केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार
यांची जयंती २२ जुलै, २०२६
रोजी राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातल्या
सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जाईल, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. हा आदेश राज्यातल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह सर्व शाळा
आणि महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे.
****
धाराशिव
शहरात आज सकाळी भूगर्भातून मोठा आवाज झाला. यामुळे खिडक्यांची तावदानं हादरली तसंच जमीनही कंप पावल्याचं निदर्शनास
आलं. त्यामुळे नागरिक भयभीत झाल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात यंदा
मान्सूनचा वेग अद्याप समाधानकारक नसून आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ १५४ मिलिमीटर म्हणजेच २७ पूर्णांक
दोन टक्के इतका पाऊस झाला आहे. केज तालुक्यात सर्वाधिक २६९ पूर्णांक
पाच मिलिमीटर, तर सर्वात कमी गेवराई तालुक्यात १०६ मिलिमीटर
पावसाची नोंद झाली.
****
जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूने उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या
सामन्यात सिंधूने चीन च्या कि हान यू हिचा २१–१६, २१–१४ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत
तनिषा क्रॅस्टो आणि ध्रूव कपिला या भारतीय जोडीचा चीनच्या जोडीकडून पराभव झाला.
****
पुरुषांच्या
क्रिकेटमध्ये, भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय
सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं खेळला जाणार
आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता
सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत एक –शून्यनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment