आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
३ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
जम्मू
काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या
चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. आज सकाळी ही चकमक झाली. ठार झालेल्या दहशतवाद्याची अद्याप
ओळख पटली नसून, चकमक अजूनही सुरुच असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नाशिक
शहारातल्या ३१ महिलांचे वॉट्स अॅप हॅक करणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांनी राजस्थान मध्ये
अटक केली. गेल्या २८ जूनला नाशिक मधल्या महिला सायकालिस्ट मनीषा रौंदळ आणि डॉ सारिका
देवरे यांचं अकाउंट हॅक करुन अनेकांना अश्लील संदेश पाठवण्यात आले होते. यानंतर नाशिक
पोलिसांकडे ३१ तक्रारी दाखल झाल्या होत्या.
****
पुणे
- अहमदनगर रस्त्यावर लोणीकंद गावाजवळ झालेल्या मिनी बस आणि टँकरच्या अपघातात सहा जण
ठार तर सात जण जखमी झाले. काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात
मृत पावलेले सर्वजण पुणे शहरातले रहिवासी आहेत.
****
हिंगोली
जिल्ह्यात वृक्ष लागवड सप्ताहाअंतर्गत पहिल्या दोन दिवसात दोन लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. या सप्ताहात हिंगोली जिल्ह्याला
सात लाख झाडं लावण्याचं उद्दीष्ट देण्यात आलं आहे.
****
शेतकरी
कर्जमाफी योजनेच्या निकषांवर राज्य सरकार फेरविचार करणार असल्याचे संकेत सहकार आणि
पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. काल सोलापुरात राज्य शिखर बँकेच्या ४८ व्या
शाखेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
शेतकऱ्यांच्या
संपूर्ण कर्जमाफीसाठी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मागणी लावून धरणार असल्याचं,
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल
कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते
****
ज्येष्ठ
अभिनेते मधुकर तोरडमल यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे
होते. त्यांनी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटातून भूमिका साकारल्या.
****
No comments:
Post a Comment