आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१५ नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची
आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली अर्पण केली आहे. सरदार पटेल यांचे विचार,
तसंच देशाच्या एकतेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरित करत
राहतील, असं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज
एक दिवसाच्या गुजरातच्या दौऱ्यावर असून, ते नर्मदा जिल्ह्यात केवडिया वसाहतीमधल्या
वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या
जगातल्या सर्वात उंच पुतळ्याला भेट देणार आहेत.
****
जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा बलाचे
जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले, तर दोन जवान जखमी
झाले. आज पहाटे ही चकमक उडाली.
****
नगरपालिकांच्या उत्पन्नाचे स्रोत चांगले असतील तर
विकास कामांना गती मिळू शकते, असं नगरपालिका प्रशासनाचे संचालक मुथ्थुकृष्णन शंकरनारायणन
यांनी म्हटलं आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात काल प्रशासकीय कामकामाजाचा आढावा
घेतल्यानंतर ते बोलत होते. कर वसुली वाढवण्यासह रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याची सूचना
त्यांनी यावेळी केली.
****
जालना जिल्ह्याच्या गोंदी पोलीस ठाण्यातला पोलीस
हेड कॉन्स्टेबल शत्रुघ्न मंडाळे याच्या विरुध्द काल गोंदी पोलीस ठाण्यात ४० हजारांची
लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात अटक न करता, तपासात मदत करण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
लातूर जिल्ह्यातल्या उमरगा इथं आजपासून दोन दिवस
राज्यस्तरीय शिक्षिका साहित्य संमेलनाला सुरूवात होत आहे. या संमेलनात आज आणि उद्या
परिसंवाद, काव्यसंमेलन, कथाकथन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, संमेलनाच्या
पूर्वसंध्येला काल सायंकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली.
*****
***
No comments:
Post a Comment