Thursday, 6 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.09.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

६ सप्टेंबर  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी उत्पादन शुल्कात कपातीच्या शक्यतेचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इन्कार केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर अस्थिर असल्यानं, इंधनाचे दर वाढले असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.

****



 महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी समाजाच्या सर्वच स्तरातून टीका होत असलेले आमदार राम कदम यांनी ट्वीटरवरून माफी मागितली आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून, आपल्या राजकीय हितशत्रूंनी हा वाद निर्माण केला, त्यामुळे माता भगिनींची मतं दुखावली, मात्र सर्व माता भगिनींबद्दल आदर व्यक्त करत, माफी मागत असल्याचं, त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

****



 केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाकडून, दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उच्च गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेरिट अवार्ड या पुरस्कारांचं वितरण नुकतंच दिल्लीत पार पडलं. यात नांदेडच्या महात्मा फुले हायस्कूलची विद्यार्थिनी नुपूर गायकवाड हिला दहावीत नव्व्याण्णव टक्के गुण मिळवल्याबद्दल गौरवण्यात आलं.

****



 नाशिक मर्चंट बँकेवर रिझर्व्ह बँकेच्या वतीनं नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांनी गेल्या चार वर्षात घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याचा ठराव काल बँकेच्या वार्षिक सर्व साधारण सभेत करण्यात आला. नाशिक मर्चंट बँक ही नाशिक मधली सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असून गेल्या चार वर्षांपासून बँकेवर प्रशासक नियुक्त आहेत. बँकेची अनुत्पादक मालमत्ता वाढत असल्यामुळे लाभांश वाटपावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातल्याबद्दल बँकेचे प्रशासक जे एम भोरिया यांना या सभेत खुलासा विचारण्यात आला, तसंच बँकेची निवडणूक डिसेंबर महिन्यापूर्वीं घ्यावी असा ठरावही या बैठकीत करण्यात आला.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...