Friday, 17 March 2017

TEXT - AIR News Bulletin, Aurangabad 17.03.2017 10.00am


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१७ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

काचेचा थर दिलेल्या मांजावर बंदी घालण्यासंदर्भातले उच्च न्यायालयानं दिलेले आदेश आणि राज्य शासनानं जारी केलेल्या अधिसूचनांची प्रत पेटा या प्राणी हक्क संस्थेनं राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाकडे त्वरीत सादर करावी असे निर्देश न्यायाधिकरणाचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार यांनी दिले आहेत. काच, नायलॉन आणि इतर पदार्थांचा थर देऊन तयार केलेल्या पतंगाच्या मांज्यामुळे सजीवसृष्टीला मोठा धोका पोहचू शकतो, असं स्वतंत्रकुमार यांनी हे आदेश देताना म्हटलं आहे. पेटानं मांजाच्या दुष्परिणामांबाबत दाखल केलेल्या याचिकेवर न्यायाधिकरणानं ही सूचना केली आहे. येत्या दोन दिवसात सर्व राज्य सरकारांनीही यावर जारी केलेल्या अधिसूचना न्यायाधिकरणाकडे पोहचवाव्यात असंही यात म्हटलं आहे.

****

परराष्ट्र मंत्रालयानं टपाल कार्यालयात पारपत्र सेवा केंद्र सुरु करण्याच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालय आणि टपाल विभाग गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यात १९ टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या संघटित तसंच असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी कौशल्य विकास योजना राबविण्यास केंद्र शासनानं मान्यता दिली आहे. यानुसार औरंगाबादसह पाच महसूल विभागांमध्ये प्रत्येकी एक प्रशिक्षक नियुक्त केला जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजी पटील निलंगेकर यांनी दिली.

****

राज्य ऑलम्पिक संघटनेच्या कार्यकारी सदस्यपदी उस्मानाबाद इथल्या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. चंद्रजीत जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल पुण्यात ही निवडणूक पार पडली. २०१७ ते २०२१ या पाच वर्षांसाठी ही निवड असेल.

//****//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 27 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...