आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१८ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
दहा रुपये मूल्याची प्लास्टिकची नोट
छापण्यास रिजर्व्ह बँकेला परवानगी दिली असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुनराम
मेघवाल यांनी काल लोकसभेत सांगितलं. देशात पाच ठिकाणी, चलनी नोटांचं आयुष्य वाढावं,
म्हणून हा निर्णय घेतला असून देशभरात पाच ठिकाणी
ही नोट प्रायोगिक तत्वावर वापरुन पाहण्याचा सरकारनं निर्णय घेतला असल्याचं, ते म्हणाले.
****
२०१७-१८ या
आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात
सादर होणार आहे. आज दुपारी दोन वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत
तर अर्थ राज्यमंत्री दीपक
केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून अर्थसंकल्पाचं थेट प्रसारण
होणार आहे.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या कृषिनिष्ठ
शेतकरी पुरस्कारांचं वितरण आज जिल्हा
परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होत
आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगला गुंडले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. नाविन्यपूर्ण शेती तसंच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या १७ शेतकऱ्यांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी इथं येत्या
दोन एप्रिलला होणाऱ्या चौथ्या बौध्द साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ.विनोद
जगतकर तर निमंत्रक म्हणून माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची सर्वानुमते
निवड करण्यात आली. बौध्द साहित्य पषिदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात विचारवंत
डॉ. प्रदिप आगलावे यांची यापुर्वीच निवड झाली आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं अवैध
गर्भपात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बेकायदा गर्भपात केंद्र अथवा सोनोग्राफी
केंद्र शोधून त्यांचावर कडक कारवाई करण्यासाठी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
प्रसुतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांविषयी,
व्यक्तींविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तीस २५ हजार रूपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी ही माहिती
दिली.
****
No comments:
Post a Comment