Monday, 10 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.09.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१० ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी इंधनवाढीविरोधात देशभर स्वतंत्रपणे पुकारलेल्या आजच्या भारत बंदला जनता दल सेक्युलर, समाजवादी पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनी पाठिंबा दिला आहे तर, आम आदमी पक्ष, बिजू जनता दल, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी या बंदपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदला राज्यात काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.

 नांदेड जिल्हयातले काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते, बंदमध्ये सहभागाचं आवाहन करत रस्त्यावर उतरले आहेत. नांदेड शहरात खाजगी वाहनं, अॅटोरिक्षा, बस सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

 सातारा, पालघर तसंच नाशिक जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

 बंद मधून शाळा आणि शालेय वाहतूक वगळण्यात आल्यानं, नाशिक शहरातल्या शाळा सुरु आहेत. औरंगाबाद इथंही शाळा महाविद्यालयं सुरू आहेत.

****

 नांदेड इथले सामाजिक कार्यकर्ते विधीज्ञ शिवाजी उर्फ बाळासाहेब शिराढोणकर यांचं काल सकाळी निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. आणि बाणीच्या काळात आंदोलनात सक्रीय असलेला शिराढोणकर यांनी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या 'भारत जोडो' अभियानातही योगदान दिलं होतं. त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता.

****

 ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांचं आज पहाटे लातूर इथं निधन झालं, ते ८९  वर्षांचे होते. आज दुपारी अंकोली पाटी इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्सकार होणार आहेत. चिगरी गुरुजी यांच्या संगीत क्षेत्रातल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनं, पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे.

****

 हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात आज सकाळी साडेसहाच्या सुमाराला मध्यम तीव्रतेचा भूकंप झाला, त्याचे धक्के दिल्लीतही जाणवले. गेल्या चोवीस तासात दिल्लीमध्ये जाणवलेला हा भूकंपाचा दुसरा धक्का असल्याचं राष्ट्रीय भूकंपमापन केंद्रानं सांगितलं.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 20 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती...