Wednesday, 13 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 13.09.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 SEP. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ सप्टेंबर २०१७ दुपारी १.००वा.

****

सहमतीनं घटस्फोट घेवू इच्छिणाऱ्या हिंदू जोडप्यांना न्यायालयाकडून सहा महिने प्रतिक्षा करण्याच्या नियमातून कनिष्ट न्यायालयाकडून सूट दिली जाऊ शकते, असं मत सर्वोच्च न्यायालायनं व्यक्त केलं आहे. हे जोडपं घटस्फोटाबद्दल ठाम असल्यास आणि त्यांच्या एकत्र येण्याची काहीही शक्यता दिसत नसल्याच्या या नियमातून न्यायालय त्यांना सहा महिने प्रतिक्षा करण्याची सूट देऊन तत्काळ घटस्फोट मान्य करू शकते, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

****

आमदार आणि खासदारांच्या विरोधात दाखल होणाऱ्या फौजदारी खटल्यांच्या सुनावण्यांसाठी जलदगती न्यायालयं स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारनं विचार कराता, असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे. कायदे बनवणाऱ्यांच्याच विरोधात जेव्हा असे खटले दाखल होतात तेव्हा त्यांची सुनावणी त्वरित व्हावी या दृष्टीनं व्यवस्था करण्यासाठी संसद सक्षम उसून या संदर्भात कायदा आणि जलदगती न्यायालयांची स्थापना सरकारनं करावी,असं न्यायालयानं म्हटलं आहे. आमदार किंवा खासदारपद मिळाल्यानंतर अचानकपणे संपत्तीत वाढ झालेल्या व्यक्तींच्या तपासासाठी  एक कायमस्वरूपी यंत्रणा असावी, अशा आशयाच्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यालयानं केंद्र सरकारला ही सूचना केली आहे.

****

दिव्यांगाना त्यांच्या हक्कांबाबत आणि त्यांच्यासाठीच्या केंद्र सरकारच्या विविध योजनांबद्दल दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून माहिती देण्यात येईल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं आहे. काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दिव्यांगांच्या हक्कांबाबत जनतेनंही संवेदनशील असलं पाहिजे , अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

राज्याच्या मंत्र्यांनी पंधरा सप्टेंबरपर्यंत आपल्या कामाचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. येत्या ऑक्टोंबर महिन्यात सरकारला सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.

*****

मतदार याद्या तयार करण्यासाठी निवडणूक आयोगानं ERO- Net  ही नवीन संगणक प्रणाली विकसीत केली आहे. या प्रनालीच्या आधारेच मतदार याद्या तयार करण्यात येणार असल्यामुळे, नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी आपले अर्ज प्राधान्याने ऑनलाईन भरावेत, असं आवाहन राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

काही जिल्हे वगळता  बहुतांश भाागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात समाधान कारक वाढ झाली आहे. राज्यात जून पासून आतापर्यंत सातशे सत्यांएशी मिली मीटर म्हणजेच अठ्याहत्तर टक्के , इतका पाऊस झाला असून धरणांमध्ये सरासरी सदुसष्ट टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. राज्याच्या सात जिल्ह्यांमध्ये सरासरी शंभर टक्क्यांहून जास्त पाऊस झाला असून त्यात मराठवाडयातल्या बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. जालना आणि लातूर जिल्ह्यांमध्ये ७६ ते १०० टक्के वर औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या पन्नस ते पंचाहत्तर टक्के पाऊस झाला आहे राज्यात काही ठिकाणी अजूनही एकूण तीनशे दोन टॅंकर्सव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असून , त्यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद सह राज्यातल्या नऊ जिल्ह्यातल्या गावांचा समावेश आहे.

****

आज सकाळी मुंबईच्या उपनगरीय हार्बर रेल्वेमार्गावरच्या कॉटनग्रीन स्थानकावर एका लोकलगाडीचं इंजिन खराब झाल्यामुळे पनवेलहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे कडे जाणारी लोकल सेवा पूर्णपणे बंद पडली. यामुळे हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागल्यास याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या नवजात शिशुंच्या तसंच नाशिक इथल्या अर्भक मृत्यूंच्या संदर्भात शासनानं स्थापन केलेल्या समितीची पहिली बैठक काल आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्यातल्या बारा विशेष नवजात उपचारकक्षांचं श्रेणीवर्धन करण्याचा आणि राज्यातल्या आठ ठिकाणी असे नवीन उपचार कक्ष उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. नाशिक, अमरावती आणि चंद्रपूर जिल्हा रुग्णालयांमध्ये नवजात अतिदक्षता केंद्रं प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा प्रस्तावही या समितीनं मांडला आहे.

****

सेऊल इथे आजपासून सुरु झालेल्या कोरियन खुल्या सुपरसेरिज बॅडमिंटन स्पर्धेमर्ध्ये भारताच्या पी.व्ही. सिंधूनं आपला पहिल्या फेरीचा सामना जिंकलाआहे. या स्पर्धेच्या महिला एकेरी मध्ये सिंधू ही भारताची एकच खेळाडू सहभागी होत असून, तिला या स्पर्धेसाठी पाचवं मानांकन प्राप्त झालं आहे. बी साई प्रणित एच एस प्रणॉय , पी कश्यप, सौरभ वर्मा आणि समोर वर्मा हे भारतीय खेळाडूही आपले पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीचे सामने  आज खेळत असून, पी कश्यप आणि समीर वर्मानं आपापले सामने जिंकल्याचं वृत्त आहे.

*****






No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...